lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > नव्या वर्षाच्या प्रारंभीच निर्यातीत 16 टक्के वाढ

नव्या वर्षाच्या प्रारंभीच निर्यातीत 16 टक्के वाढ

शुभवर्तमान : अर्थव्यवस्थेत सुधारणेचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 02:13 AM2021-01-11T02:13:01+5:302021-01-11T02:13:14+5:30

शुभवर्तमान : अर्थव्यवस्थेत सुधारणेचे संकेत

Exports up 16 per cent at the start of the new year | नव्या वर्षाच्या प्रारंभीच निर्यातीत 16 टक्के वाढ

नव्या वर्षाच्या प्रारंभीच निर्यातीत 16 टक्के वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामधून भारतीय अर्थव्यवस्था आता सुधारू लागली असून, जानेवारी महिन्याच्या पहिल्याच सप्ताहामध्ये देशाच्या निर्यातीमध्ये वाढ झाली आहे. औषधे आणि इंजिनीअरिंग या क्षेत्रांमधील निर्यात वाढल्यामुळे ही वाढ नोंदविली गेली आहे. 

वाणिज्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती देतांना सांगितले की, मागील वर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या सप्ताहामध्ये ५.३४ अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. या वर्षी मात्र त्यामध्ये वाढ होऊन ती ६.२१ अब्ज डॉलरवर गेली आहे. याचाच अर्थ, वार्षिक वाढीचा विचार करता, निर्यातीमध्ये १६.२२ टक्के एवढी वाढ झाली आहे. याच कालावधीमध्ये देशात झालेल्या आयातीतही वाढ झाल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली. आयातीमध्ये १.०७ टक्के वाढ होऊन ती ८.७ अब्ज डाॅलरवर पोहोचली आहे. मागील वर्षी ती ८.६ अब्ज डाॅलर होती. निर्यातीमध्ये झालेली वाढ ही रत्ने आणि दागिने, इंजिनीअरिंग उद्योग आणि रसायने उद्योगाने केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे झाली आहे. डिसेंबर महिन्यामध्ये नऊ महिन्यांच्या खंडानंतर देशाच्या निर्यातीमध्ये वाढ झालेली दिसून आली. 

या क्षेत्रांमध्ये वाढली निर्यात
जानेवारी महिन्याच्या पहिल्या सप्ताहामध्ये औषधे, पेट्रोलियम पदार्थ आणि इंजिनीअरिंगच्या वस्तू यांची निर्यात वाढलेली दिसून आली. या सप्ताहात औषधांची निर्यात  ६.१६२ कोटी डॉलरची झाली. मागील वर्षाच्या तुलनेत त्यामध्ये १४.४ टक्के वाढ झाली. पेट्रोलियम पदार्थांची निर्यात १७.२८ टक्के वाढून ११.४७२ कोटी डॉलर झाली आहे. इंजिनीअरिंग उद्योगाची निर्यात ५१.८२ टक्क्यांनी वाढून ६३.६७७ कोटी डॉलरवर गेली आहे.

Web Title: Exports up 16 per cent at the start of the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.