Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पहिल्याच दिवशी शेअरनं केला पैसा दुप्पट; गुंतवणूकदारांचा मिळालेला जबरदस्त प्रतिसाद; विजय केडियांचीही गुंतवणूक

पहिल्याच दिवशी शेअरनं केला पैसा दुप्पट; गुंतवणूकदारांचा मिळालेला जबरदस्त प्रतिसाद; विजय केडियांचीही गुंतवणूक

Exato Technologies Stock: या कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर आता कंपनीच्या शेअर्सनी लिस्टिंगवरही कमाल केली आहे. शेअर्सनी पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:02 IST2025-12-05T13:02:00+5:302025-12-05T13:02:00+5:30

Exato Technologies Stock: या कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर आता कंपनीच्या शेअर्सनी लिस्टिंगवरही कमाल केली आहे. शेअर्सनी पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.

Exato Technologies Stock Money doubled on the first day share received a tremendous response from investors Vijay Kedia also invested | पहिल्याच दिवशी शेअरनं केला पैसा दुप्पट; गुंतवणूकदारांचा मिळालेला जबरदस्त प्रतिसाद; विजय केडियांचीही गुंतवणूक

पहिल्याच दिवशी शेअरनं केला पैसा दुप्पट; गुंतवणूकदारांचा मिळालेला जबरदस्त प्रतिसाद; विजय केडियांचीही गुंतवणूक

Exato Technologies Stock: एक्साटो टेक्नॉलॉजीजच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर आता कंपनीच्या शेअर्सनी लिस्टिंगवरही कमाल केली आहे. एक्साटो टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सनी पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.

शुक्रवारी कंपनीचे शेअर्स बीएईसईवर ९० टक्क्यांच्या प्रीमिअमसह २६६ रुपये प्रति शेअर दरानं लिस्ट झाले. लिस्टिंगनंतर लगेचच कंपनीचे शेअर्स आणखी ५ टक्क्यांनी वाढून २७९.३० रुपये प्रति शेअरवर पोहोचले. आयपीओमध्ये एक्साटो टेक्नॉलॉजीजच्या शेअरचा किंमत बँड १४० रुपये होता. याचा अर्थ, आयपीओच्या किंमतीच्या तुलनेत एक्साटो टेक्नॉलॉजीजचे शेअर्स पहिल्याच दिवशी १०० टक्क्यांनी वाढले आहेत.

Personal Loan चं प्रीपेमेंट केलं की क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? लोन बंद करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

विजय केडिया यांचाही कंपनीत मोठा वाटा

दिग्गज गुंतवणूकदार विजय किशनलाल केडिया यांचाही एक्साटो टेक्नॉलॉजीजमध्ये मोठी गुंतवणूक आहे. कंपनीत विजय केडिया यांची ४.५ टक्के भागीदारी आहे. एक्साटो टेक्नॉलॉजीजच्या आयपीओचा एकूण आकार ३७.४५ कोटी रुपये इतका होता.

२०१६ मध्ये एक्साटो टेक्नॉलॉजीजची सुरुवात झाली होती. एक्साटो टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही एक कस्टमर ट्रान्सफॉर्मेशन पार्टनर असून, ती टेक-आधारित सोल्युशन्स उपलब्ध करते. ही सोल्युशन्स कस्टमर एंगेजमेंट्स आणि ऑपरेशनल इफिशिएंसी वाढवतात. एक्साटो टेक्नॉलॉजीज सीएक्स ॲन्ड ॲनॅलिटिक्स, यूनिफाइड कम्युनिकेशन्स ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर आणि एक्साटो आयक्यू यासह अनेक प्रकारच्या सेवा ऑफर करते. कंपनी बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस ॲन्ड इन्शुरन्स, हेल्थकेअर, रिटेल, टेलिकॉम, मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रांना आपल्या सेवा पुरवते.

आयपीओला ९४७ पटीहून अधिक सबस्क्रिप्शन

एक्साटो टेक्नॉलॉजीजच्या आयपीओला एकूण ९४७.२१ पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. कंपनीच्या आयपीओमध्ये सामान्य गुंतवणूकदारांच्या श्रेणीत १०६८.७४ पट बोली लागली. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या श्रेणीत १४८८.७२ पट सबस्क्रिप्शन मिळालं. क्वॉलीफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा कोटा ३२७.०८ पट सब्सक्राइब झाला.

एक्साटो टेक्नॉलॉजीजच्या आयपीओमध्ये सामान्य गुंतवणूकदार २ लॉटसाठीच बोली लावू शकत होते. आयपीओच्या दोन लॉटमध्ये २००० शेअर्स होते. म्हणजेच, सामान्य गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये २,८०,००० रुपये इतकी गुंतवणूक करावी लागली. अपूर्व के सिन्हा आणि स्वाती सिन्हा हे कंपनीचे प्रवर्तक आहेत. आयपीओपूर्वी एक्साटो टेक्नॉलॉजीजमध्ये प्रवर्तकांची हिस्सेदारी ७५.८५ टक्के होती, जी आता ५४.७३ टक्के राहिली आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : पहले ही दिन एक्सैटो टेक्नोलॉजीज के शेयर दोगुने; निवेशकों में खुशी, केडिया का निवेश

Web Summary : एक्सैटो टेक्नोलॉजीज के शेयर लिस्टिंग के दिन दोगुने हो गए, निवेशकों की मजबूत प्रतिक्रिया से उत्साहित। ₹266 पर लिस्टिंग के साथ, शेयर और बढ़कर ₹279.30 पर पहुंच गए। विजय केडिया की 4.5% हिस्सेदारी है। आईपीओ को 947 गुना से अधिक सब्सक्राइब किया गया, खुदरा और संस्थागत निवेशकों से महत्वपूर्ण रुचि देखी गई।

Web Title : Exato Technologies Shares Double on Debut; Investors Cheer, Kedia Invests

Web Summary : Exato Technologies shares doubled on listing day, fueled by strong investor response. Listing at ₹266, shares surged further, reaching ₹279.30. Vijay Kedia holds a 4.5% stake. The IPO, subscribed over 947 times, saw significant interest from retail and institutional investors.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.