Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > EPFO सदस्यांना मोफत मिळतो लाखो रुपयांचा लाईफ इन्शुरन्स कव्हर! काय आहे EDLI योजना?

EPFO सदस्यांना मोफत मिळतो लाखो रुपयांचा लाईफ इन्शुरन्स कव्हर! काय आहे EDLI योजना?

EPFO EDLI Scheme : कर्मचारी ठेवीशी संलग्न विमा योजनेअंतर्गत, कर्मचाऱ्याला स्वतःच्या खिशातून एकही रुपया खर्च करावा लागत नाही. संपूर्ण खर्च कंपनी भरते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 16:28 IST2025-10-08T16:04:09+5:302025-10-08T16:28:59+5:30

EPFO EDLI Scheme : कर्मचारी ठेवीशी संलग्न विमा योजनेअंतर्गत, कर्मचाऱ्याला स्वतःच्या खिशातून एकही रुपया खर्च करावा लागत नाही. संपूर्ण खर्च कंपनी भरते.

EPFO EDLI Scheme Get Free Life Insurance Cover Up to ₹7 Lakh for EPF Members | EPFO सदस्यांना मोफत मिळतो लाखो रुपयांचा लाईफ इन्शुरन्स कव्हर! काय आहे EDLI योजना?

EPFO सदस्यांना मोफत मिळतो लाखो रुपयांचा लाईफ इन्शुरन्स कव्हर! काय आहे EDLI योजना?

EPFO EDLI Scheme : तुम्ही जर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य असाल तर याविषयीच्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आपल्या सदस्यांना केवळ बचत आणि पेन्शनची सुविधाच देत नाही, तर विनामूल्य लाईफ इन्शुरन्स कव्हर देखील उपलब्ध करून देते. 'कर्मचारी ठेव संलग्न विमा योजना' म्हणजेच EDLI (Employee Deposit Linked Insurance) स्कीम अंतर्गत नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय हा विमा मिळतो.

हा विमा कव्हर कर्मचाऱ्याला कोणताही खर्च न करता मिळतो, कारण याचा संपूर्ण प्रीमियम मालक भरतात. या योजनेची सुरुवात १९७६ मध्ये करण्यात आली होती.

EDLI म्हणजे काय आणि किती कव्हर मिळते?
पीएफ खाते असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ईपीएफ, ईपीएस आणि ईडीएलआय अशा तीन योजनांचा एकत्रित लाभ मिळतो. या तीन योजना कर्मचाऱ्याला आर्थिक सुरक्षा देतात.

या योजनेत कर्मचाऱ्याला किमान कव्हर २,५०,००० रुपये तर कमाल ७,००,००० रुपये आहे. कर्मचाऱ्याच्या मागील १२ महिन्यांच्या वेतनाच्या सरासरीच्या ३५ पट इतका क्लेम मिळतो. या योजनेत अतिरिक्त १,५०,००० रुपयांचा बोनसही मिळतो. १५,००० रुपयांपेक्षा कमी किंवा जास्त मासिक वेतन असलेले सर्व ईपीएफ सदस्य या योजनेसाठी पात्र असतात. या विमा योजनेचा संपूर्ण खर्च नोकरदार उचलतात, कर्मचाऱ्याला कोणताही प्रीमियम भरावा लागत नाही.
टीप: कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास ही एकरकमी विमा रक्कम नॉमिनीला दिली जाते.

नॉमिनीने क्लेम कसा करावा?
ईडीएलआय योजनेचा लाभ घेण्यासाठी नॉमिनीला एक सोपी प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

  1. फॉर्म भरणे: नॉमिनीला फॉर्म ५ आयएफ (Form 5 IF) भरावा लागतो. यामध्ये मृत कर्मचारी आणि नॉमिनीची संपूर्ण माहिती भरावी लागते.
  2. सत्यापन : हा फॉर्म कंपनीकडून सत्यापित करून घेणे आवश्यक असते. कंपनी बंद असल्यास, हे सत्यापन गॅझेटेड ऑफिसरकडून करून घेता येते.
  3. अर्ज जमा करणे: फॉर्म ५ आयएफ संबंधित ईपीएफओ आयुक्त कार्यालयात जमा करावा लागतो.
  4. क्लेम मिळण्याचा कालावधी: एकदा फॉर्म जमा झाल्यावर, ३० दिवसांच्या आत क्लेमची रक्कम नॉमिनीला दिली जाते.

वाचा - अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही

महत्त्वाची नोंद : जर ३० दिवसांपेक्षा जास्त वेळ लागला, तर ईपीएफओला नॉमिनीला वार्षिक १२ टक्के दराने व्याज देणे बंधनकारक असते.

Web Title : EPFO सदस्यों को ₹7 लाख तक का मुफ्त जीवन बीमा!

Web Summary : ईपीएफओ सदस्यों को ईडीएलआई योजना के तहत ₹7 लाख तक का मुफ्त जीवन बीमा मिलता है। प्रीमियम नियोक्ता द्वारा भुगतान किया जाता है। नामांकित व्यक्ति ईपीएफओ को फॉर्म 5 आईएफ जमा करके दावा कर सकते हैं। दावा निपटान 30 दिनों के भीतर होता है, देरी होने पर 12% ब्याज लागू होता है।

Web Title : EPFO offers free life insurance cover up to ₹7 Lakh!

Web Summary : EPFO members get free life insurance up to ₹7 lakh under the EDLI scheme. Premiums are employer-paid. Nominees can claim by submitting Form 5 IF to EPFO. Claim settlement happens within 30 days, with 12% interest applicable for delays.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.