Lokmat Money > बिझनेस न्यूज > ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी

ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी

Elon MuskTesla : अब्जाधीश इलॉन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची साथ सोडल्यानंतर त्यांचे वाईट दिवस सुरू असल्याचे दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 11:57 IST2025-08-04T11:34:47+5:302025-08-04T11:57:12+5:30

Elon MuskTesla : अब्जाधीश इलॉन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची साथ सोडल्यानंतर त्यांचे वाईट दिवस सुरू असल्याचे दिसत आहे.

Elon Musk's Tesla Ordered to Pay $243 Million After Fatal Autopilot Crash | ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी

ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी

Elon MuskTesla : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांच्यासाठी सध्याचा काळ अडचणींचा ठरत आहे. त्यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेली मैत्री तुटल्याची बातमी ताजी असतानाच, आता त्यांची कंपनी टेस्लाला मोठी आर्थिक किंमत चुकवावी लागणार आहे. अमेरिकेतील एका ज्युरीने टेस्लाला एका अपघातातील पीडितांना २४३ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २००० कोटी रुपये) भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.

ट्रम्पपासून फारकत, टेस्लाचे शेअर्स घसरले
ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या मतभेदानंतर इलॉन मस्क यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी एक नवीन पक्ष स्थापन केल्याची चर्चा आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम टेस्लाच्या शेअर्सवरही झाला. गेल्या शुक्रवारी कंपनीचे शेअर्स सुमारे ५ टक्क्यांनी घसरले. आणि आता या अपघाताचा निकाल आल्यामुळे मस्क यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

२०१९ च्या अपघाताचे प्रकरण काय आहे?
२०१९ मध्ये टेस्लाच्या एका ऑटोपायलट कारचा अपघात झाला होता. या अपघातात २२ वर्षीय नाबेल बेनाविड्स लिओन या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिचा बॉयफ्रेंड डिलन अँगुलो गंभीर जखमी झाला. कार चालवणाऱ्या व्यक्तीने कबूल केले होते की, त्याचे लक्ष मोबाईल फोनवर असल्याने तो कार चालवताना विचलित झाला होता.

मात्र, या प्रकरणात ज्युरीने कंपनीला जबाबदार धरले आहे. त्यांनी म्हटले आहे की, जरी ड्रायव्हरने निष्काळजीपणा केला असला तरी, कंपनीची नैतिक जबाबदारी आहे. कारण टेस्ला ही आपली कार ऑटोपायलट कार असल्याचा दावा करते, जी कोणत्याही ड्रायव्हरशिवाय चालू शकते. याचा अर्थ, कंपनीने पुरवलेल्या तंत्रज्ञानामध्ये काहीतरी चूक होती. टेस्लाच्या ऑटो-पायलट सिस्टीममध्ये यापूर्वीही काही त्रुटी आढळल्या होत्या, पण त्या इतक्या गंभीर नव्हत्या की त्यांची नोंद घ्यावी. या प्रकरणात मात्र, तंत्रज्ञानाच्या चुकीमुळे एका व्यक्तीला जीव गमवावा लागला.

वाचा - २० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?

टेस्लाला भरपाई देण्याचे आदेश
या निर्णयानंतर टेस्ला कंपनीला पीडित कुटुंबाला भरपाई म्हणून २००० कोटी रुपये देण्यास सांगण्यात आले आहे. हा निकाल टेस्लासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे केवळ कंपनीच्या आर्थिक स्थितीवरच नाही, तर तिच्या ऑटो-पायलट तंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे इलॉन मस्क यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत आणि त्यांची प्रतिमाही काही प्रमाणात खराब झाली आहे.

Web Title: Elon Musk's Tesla Ordered to Pay $243 Million After Fatal Autopilot Crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.