Lokmat Money > बिझनेस न्यूज > सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई

सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई

Anil Ambani ED : अनिल अंबानी आणि त्यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशनवर एसबीआयचा २,९२९ कोटी रुपयांचा बँक घोटाळा केल्याचा आरोप आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 14:40 IST2025-09-10T14:38:32+5:302025-09-10T14:40:24+5:30

Anil Ambani ED : अनिल अंबानी आणि त्यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशनवर एसबीआयचा २,९२९ कोटी रुपयांचा बँक घोटाळा केल्याचा आरोप आहे.

ED Files New PMLA Case Against Anil Ambani in ₹2,929 Crore Bank Fraud | सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई

सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई

Anil Ambani ED : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी सेबीने येस बँकेतील गुंतवणुकीची चौकशी बंद करण्याची त्यांची मागणी फेटाळून लावली होती. आता केंद्र सरकारची तपासणी संस्था, सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत नवीन गुन्हा दाखल केला आहे.

इकोनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार, या नवीन प्रकरणात अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपनीवर भारतीय स्टेट बँकचे सुमारे २,९२९ कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण सीबीआयने २१ ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारावर नोंदवण्यात आले आहे. यापूर्वी, २३ ऑगस्ट रोजी सीबीआयने त्यांच्या मुंबईतील कार्यालयांवर आणि निवासस्थानी छापेही टाकले होते.

आरोपांचे अनिल अंबानींकडून खंडन
या प्रकरणासंदर्भात अनिल अंबानी यांच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी करत सर्व आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, या प्रकरणात त्यांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे. त्यांनी असेही स्पष्ट केले की ही तक्रार एसबीआयने सुमारे दहा वर्षांपूर्वीच्या प्रकरणांवर केली आहे. निवेदनात असेही म्हटले आहे की, त्यावेळी अनिल अंबानी RCom चे गैर-कार्यकारी संचालक होते आणि कंपनीच्या दैनंदिन व्यवस्थापनात त्यांचा थेट सहभाग नव्हता. सीबीआयच्या कारवाईनंतर आता ईडीनेही या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगच्या संशयावरून तपास सुरू केला आहे.

बँक कर्जाची सखोल चौकशी
ईडीने आतापर्यंत अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपन्यांच्या कथित बँक फसवणुकीतील भूमिकेची तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चौकशी केली आहे. १८ ऑगस्टच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईडीने १७,००० कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान, ईडीने २० हून अधिक खाजगी आणि सार्वजनिक बँकांना पत्र लिहून रिलायन्स ग्रुपला दिलेल्या कर्जांची आणि त्यांच्या क्रेडिट तपासणीची माहिती मागवली आहे.

वाचा - ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल

अनिल अंबानींच्या निकटवर्तीयाची चौकशी
या प्रकरणात, ईडीने मंगळवारी अनिल अंबानींचे माजी निकटवर्तीय अमिताभ झुनझुनवाला यांचीही चौकशी केली, जे यापूर्वीही तपासणीदरम्यान एजन्सीसमोर हजर झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसबीआयच्या मुंबई शाखेच्या डीजीएम ज्योती कुमार यांनी १८ ऑगस्ट रोजी ईडीकडे तक्रार दाखल केल्यानंतर या बँक फसवणुकीचा खुलासा झाला. ज्योती कुमार यांनी सांगितले की, हे प्रकरण ऑक्टोबर २०२० मध्ये एका फॉरेन्सिक ऑडिटरच्या अहवालातून समोर आले होते.
 

Web Title: ED Files New PMLA Case Against Anil Ambani in ₹2,929 Crore Bank Fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.