भारतात महिलांसाठी सोने हे केवळ दागिना नसून ती एक भावनिक गुंतवणूक मानली जाते. मात्र, आता हेच सोने तुमच्यासाठी उत्पन्नाचा दुसरा स्रोत बनू शकते. जर प्रचंड किमतीचे साेने लॉकरमध्ये बंद राहिले तर ते देशाचे आणि गुंतवणूकदारांचे नुकसान आहे. त्यामुळे तुमच्या सोन्यापासून दुसरे उत्पन्न मिळवण्याचे मार्ग तयार करू शकता.
गोल्ड मॉनिटायझेशन -
ही केंद्र सरकारची अधिकृत योजना असून, याद्वारे सोने बँकेत जमा करून २.२५% ते २.५% वार्षिक व्याज मिळवता येते.
नेमके पैसे कसे मिळतात?
तुमचे दागिने किंवा नाणी तुम्ही बँकेत किंवा चाचणी केंद्रात जमा करू शकता. तेथे त्याची शुद्धता तपासली जाते. त्यानंतर ते वितळवून बँकेत जमा केले जाते आणि तुम्हाला ‘डिपॉझिट सर्टिफिकेट’ मिळते. मुदत संपल्यावर तुम्ही सोन्याची तत्कालीन किंमत किंवा सोने परत घेऊ शकता.
हे कायम लक्षात ठेवा
ही एक अल्पकालीन ठेव योजना आहे, जी एक ते तीन वर्षांपर्यंत असते. दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या ती तितकिशी आकर्षक वाटत नाही.
१० ग्रॅम सोने जमा करणे बंधनकारक आहे, सोने वितळवल्यानंतर ते त्याच स्वरूपात परत मिळत नाही. ही योजना त्यांच्यासाठी आहे ज्यांचे सोने पडून आहे.
३४,६०० टन इतके सोने भारतीय नागरिकांनी घरात साठवले आहे. सोन्याची किंमत ३७७ लाख कोटी रुपये आहे.
गोल्ड लिजिंग -
हा एक नवा, आधुनिक प्रकार आहे, यात तुम्ही तुमचे सोने ज्वेलर्सना भाड्याने देऊन २% ते ५% वार्षिक परतावा मिळवू शकता.
या योजनेत नेमके काय होते?
सेफगोल्ड, मायगोल्ड, गुल्लक आणि स्पेअर ८ सारख्या प्लॅटफॉर्मवर भागीदार ज्वेलर्सना सोने उधारीवर द्या. मात्र, प्लॅटफॉर्म व ज्वेलर्स विश्वसनीय आहेत याची खात्री करा. त्यानंतर नावावर एक डिजिटल गोल्ड अकाउंट तयार केले जाते. सोने कोणत्या ज्वेलर्सला भाड्याने द्यायचे ते तुम्ही ठरवा.
हे लक्षात ठेवा
दागिने वितळवले जातात. त्यामुळे ते त्याच स्वरूपात परत केले जात नाहीत. रिटर्न्स ज्वेलर्सच्या क्रेडिट गुणवत्तेवर अवलंबून असतो.
जर तुम्हाला नंतर प्रत्यक्ष सोन्याचे दागिने परत घ्यायचे असेल तर तुम्हाला डिलिव्हरी शुल्क द्यावे लागेल. इतर कोणतेही शुल्क नाही.
