Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतातून प्रचंड नफा कमवतात; काय व्यवसाय करतात? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 17:43 IST2025-08-26T17:39:33+5:302025-08-26T17:43:01+5:30

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतातून प्रचंड नफा कमवतात; काय व्यवसाय करतात? जाणून घ्या...

Donald Trump: Trump, who called India a 'dead economy', has a big investment here; Earns crores of rupees every month, know | भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

Donald Trump: एकीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पभारताला मृत अर्थव्यवस्था म्हणतात, तर दुसरीकडे भारतातून प्रचंड नफा कमवतात. डोनाल्ड ट्रम्प हे एक राजकारणी असण्यासोबतच एक यशस्वी उद्योजकही आहेत. अमेरिकेसह त्यांची भारतातही मोठी गुंतवणूक आहे, ज्यातून ते मोठी कमाई करतात. चला जाणून घेऊया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतातून किती कमावतात?

काय आहे ट्रम्प यांचा व्यवसाय ?
डोनाल्ड ट्रम्प भारतावर कितीही टीका करो किंवा कर लादोत, पण याच भारतातून मोठी कमाई करतात. ट्रम्पची भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रात मजबूत पकड आहे. त्यांची कंपनी 'द ट्रम्प ऑर्गनायझेशन' ने भारताला अमेरिकेबाहेरची सर्वात मोठी आणि सर्वात फायदेशीर रिअल इस्टेट बाजारपेठ बनवली आहे. ट्रम्प भारतात जमीन खरेदी करत नाहीत किंवा बांधकाम कामात थेट पैसे गुंतवत नाहीत. ते फक्त भारतीय विकासकांना त्यांचा ब्रँड 'ट्रम्प' वापरण्याची परवानगी देतात आणि त्या बदल्यात मोठा नफा कमवतात.

एका अहवालानुसार, २०२४ मध्ये ट्रम्प ऑर्गनायझेशनने भारतीय प्रकल्पांमधून १० मिलियन डॉलर्स कमावले. २०१२ मध्ये ट्रम्प ऑर्गनायझेशनने भारतात आपला पहिला प्रकल्प सुरू केला होता. २०१२ ते २०१९ दरम्यान ट्रम्प यांना मुंबई, पुणे, गुरुग्राम, कोलकाता सारख्या मोठ्या शहरांमधील चार प्रकल्पांमधून ११.३ मिलियन डॉलर्स रॉयल्टी आणि शुल्क मिळाले. आजपर्यंत त्यांनी मुंबई, पुणे, गुरुग्राम, कोलकाता, हैदराबाद आणि नोएडा सारख्या मोठ्या शहरांमधील १३ हून अधिक लक्झरी प्रकल्पांमधून भरपूर कमाई केली आहेत. 

ट्रम्प यांनी आतापर्यंत किती कमाई केली ?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या कंपनीने आतापर्यंत भारतातून १७५ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. तर, आगामी प्रकल्पांमधून १५,००० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. जर आपण मासिक आधारावर पाहिले, तर ट्रम्प यांच्या कंपनीला भारतातून दरमहा सरासरी १० ते १५ कोटी रुपये कमाई होते. नवीन प्रकल्पांसह हा आकडा वाढू शकतो.

Web Title: Donald Trump: Trump, who called India a 'dead economy', has a big investment here; Earns crores of rupees every month, know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.