Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ग्लोबल टॅरिफवर 'सुप्रीम' दणका बसल्यानंतर अमेरिकन वाणिज्य सचिव अचानक भारत दौऱ्यावर, कारण...

ग्लोबल टॅरिफवर 'सुप्रीम' दणका बसल्यानंतर अमेरिकन वाणिज्य सचिव अचानक भारत दौऱ्यावर, कारण...

Donald Trump Tariff: अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लटनिक अचानक भारत दौऱ्यावर आले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 13:01 IST2026-02-27T13:00:31+5:302026-02-27T13:01:58+5:30

Donald Trump Tariff: अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लटनिक अचानक भारत दौऱ्यावर आले आहेत.

Donald Trump Tariff: After the 'Supreme' blow to global tariffs, US Commerce Secretary suddenly visits India | ग्लोबल टॅरिफवर 'सुप्रीम' दणका बसल्यानंतर अमेरिकन वाणिज्य सचिव अचानक भारत दौऱ्यावर, कारण...

ग्लोबल टॅरिफवर 'सुप्रीम' दणका बसल्यानंतर अमेरिकन वाणिज्य सचिव अचानक भारत दौऱ्यावर, कारण...

Donald Trump Tariff: ग्लोबल टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसल्यानंतर, अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लटनिक अचानक भारत दौऱ्यावर आले आहेत. अमेरिकन सुप्रीम कोर्टाने ट्रम्प यांचा ग्लोबल टॅरिफचा निर्णय अमान्य ठरवल्यानंतर अवघ्या काही दिवसांत हा दौरा झाल्याने महत्त्व वाढले आहे.

पीयूष गोयल यांच्यासोबत बैठक

गुरुवारी (26 फेब्रुवारी) हॉवर्ड लटनिक यांनी दिल्ली दौऱ्यात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत भेट घेतली. या भेटीत भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार व आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतामधील अमेरिकी राजदूत सर्जियो गोर आणि मंत्री पीयूष गोयल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर यासंदर्भात स्वतंत्र पोस्ट केल्या. तिघांचा एकत्र फोटो शेअर करताना सर्जियो गोर यांनी लिहिले, हॉवर्ड लटनिक आणि पीयूष गोयल यांच्यासोबतचे दुपारचे जेवण अत्यंत अर्थपूर्ण ठरले. दोन्ही देशांसाठी सहकार्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

पीयूष गोयल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, भारत-अमेरिका व्यापार आणि आर्थिक भागीदारी अधिक विस्तारण्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि अर्थपूर्ण चर्चा झाली.

लंचनंतर जोधपूरकडे रवाना

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, अमेरिकी वाणिज्य विभागाने सांगितले की, दोन्ही देशांमधील व्यापार व आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा झाली. मात्र, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.

दिल्लीतील बैठकीनंतर हॉवर्ड लटनिक जोधपूरकडे रवाना झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, तेथे ते टेक क्षेत्रातील नामवंत कार्यकारी निकेश अरोरा यांची कन्या आयशा अरोरा आणि आइस हॉकी स्टार जॅक ह्यूजेस यांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

सुप्रीम कोर्टाचा ट्रम्प यांना दणका

महत्वाचे म्हणजे, ही बैठक भारत-अमेरिका व्यापार संबंधांच्या निर्णायक टप्प्यावर झाली आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने 20 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती कायद्यांतर्गत (IEEPA) अधिकारांचा वापर करून, ग्लोबल टॅरिफ लावण्याचा ट्रम्प यांचा निर्णय रद्द ठरवला. यामुळे ट्रम्प प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर हा दौरा झाल्यामुळे, या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागलून आहे.
 

Web Title : ट्रम्प के टैरिफ झटके के बाद अमेरिकी वाणिज्य सचिव का भारत दौरा

Web Summary : ट्रम्प के वैश्विक टैरिफ पर सुप्रीम कोर्ट के फैसले के बाद, अमेरिकी वाणिज्य सचिव ने भारत का दौरा किया। पीयूष गोयल के साथ व्यापार और आर्थिक संबंधों को मजबूत करने पर चर्चा हुई। बाद में वे जोधपुर में एक शादी में शामिल हुए।

Web Title : US Commerce Secretary Visits India After Trump Tariff Setback.

Web Summary : Following a Supreme Court blow to Trump's global tariffs, the US Commerce Secretary visited India. Discussions with Piyush Goyal focused on strengthening trade and economic ties. He later attended a wedding in Jodhpur.