Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?

Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?

Post Office MIS Scheme: देशातील सामान्य नागरिकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी, पोस्ट ऑफिस विविध बचत योजना चालवते. तुम्ही या स्कीममध्ये पत्नीसोबत गुंतवणूक केलीत तर तुम्ही मालामाल होऊ शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 12:54 IST2025-11-07T12:51:54+5:302025-11-07T12:54:01+5:30

Post Office MIS Scheme: देशातील सामान्य नागरिकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी, पोस्ट ऑफिस विविध बचत योजना चालवते. तुम्ही या स्कीममध्ये पत्नीसोबत गुंतवणूक केलीत तर तुम्ही मालामाल होऊ शकता.

Deposit rs 4 lakh in this Post Office mis scheme with your wife see how much interest you will get per month | Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?

Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?

Post Office MIS Scheme: देशातील सामान्य नागरिकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी, पोस्ट ऑफिस विविध बचत योजना चालवते. पोस्ट ऑफिस बचत योजनांपैकी, MIS (मासिक उत्पन्न योजना) ही एक उत्तम आणि लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत, तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करावी लागते, त्यानंतर तुम्हाला दरमहा निश्चित व्याज मिळते. आज, आपण पोस्ट ऑफिस MIS योजनेत ४ लाख रुपये जमा केल्यास तुम्हाला दरमहा किती व्याज मिळेल हे जाणून घेऊ.

किती मिळतो व्याजदर?

पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेत सध्या वार्षिक ७.४ टक्के व्याजदर मिळत आहे. मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत किमान १००० रुपयांची एकरकमी गुंतवणूक करता येते. इतकंच काय तर तुम्ही यात जास्तीत जास्त ९ लाख रुपये गुंतवू शकता. पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेअंतर्गत, तुम्ही संयुक्त खात्यात जास्तीत जास्त १५ लाख रुपये जमा करू शकता. एमआयएस योजनेअंतर्गत, एका संयुक्त खात्यात जास्तीत जास्त तीन जणांना जोडले जाऊ शकते.

पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'

५ वर्षात अकाऊंट होतं मॅच्युअर

पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीम (Monthly Income Scheme - MIS) मध्ये तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागते, त्यानंतर तुमच्या बँक खात्यात दर महिन्याला व्याजाचे निश्चित पैसे जमा होण्यास सुरुवात होते. ही योजना ५ वर्षांत मॅच्युअर होते. मॅच्युरिटी झाल्यावर तुमच्या एमआयएस खात्यात जमा असलेली सर्व रक्कम तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते. तुम्ही या योजनेत तुमच्या पत्नीसोबत मिळून संयुक्त खाते (Joint Account) सहजपणे उघडू शकता. जर तुम्ही तुमच्या पत्नीसह मिळून या योजनेत ४ लाख रुपये जमा केले, तर तुमच्या बँक खात्यात दर महिन्याला २,४६७ रुपये इतकx निश्चित व्याज मिळेल.

एमआयएस खाते उघडण्यासाठी बचत खाते आवश्यक

पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीममध्ये खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे पोस्ट ऑफिसचं बचत खातं असणं आवश्यक आहे. जर तुमचं पोस्ट ऑफिसमध्ये कोणतेही बचत खातं नसेल, तर तुम्हाला आधी बचत खातं उघडावं लागेल. त्यानंतरच तुम्ही मंथली इन्कम स्कीममध्ये खातं उघडू शकता. पोस्ट ऑफिसच्या सर्व योजनांमध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात, कारण पोस्ट ऑफिस एक सरकारी विभाग आहे, ज्यावर केंद्र सरकारचं नियंत्रण असते.

Web Title : पत्नी के साथ पोस्ट ऑफिस एमआईएस में ₹4 लाख जमा करें, पाएं मासिक ब्याज!

Web Summary : पोस्ट ऑफिस एमआईएस 7.4% वार्षिक ब्याज प्रदान करता है। पत्नी के साथ संयुक्त रूप से ₹4 लाख निवेश करें और ₹2,467 मासिक प्राप्त करें। पोस्ट ऑफिस बचत खाता आवश्यक है। यह 5 वर्षों में परिपक्व होता है और सरकार द्वारा सुरक्षित है।

Web Title : Invest ₹4 Lakh in Post Office MIS with Wife, Get Monthly Interest!

Web Summary : Post Office MIS offers 7.4% annual interest. Invest ₹4 lakh jointly with your wife and receive ₹2,467 monthly. Requires a post office savings account. It matures in 5 years and is government secured.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.