Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पोलादाची मागणी ०.७ टक्क्यांनी वाढली

पोलादाची मागणी ०.७ टक्क्यांनी वाढली

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशात पोलाद मागणी ०.७ टक्क्यांनी वाढून १.८८ कोटी टनावर राहिली. गेल्या वर्षी याच काळात एक कोटी ८६.९ लाख टन पोलादाची मागणी झाली होती

By admin | Updated: July 14, 2014 01:24 IST2014-07-14T01:24:09+5:302014-07-14T01:24:09+5:30

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशात पोलाद मागणी ०.७ टक्क्यांनी वाढून १.८८ कोटी टनावर राहिली. गेल्या वर्षी याच काळात एक कोटी ८६.९ लाख टन पोलादाची मागणी झाली होती

The demand for steel rose by 0.7 percent | पोलादाची मागणी ०.७ टक्क्यांनी वाढली

पोलादाची मागणी ०.७ टक्क्यांनी वाढली

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशात पोलाद मागणी ०.७ टक्क्यांनी वाढून १.८८ कोटी टनावर राहिली. गेल्या वर्षी याच काळात एक कोटी ८६.९ लाख टन पोलादाची मागणी झाली होती. पोलाद मंत्रालयाच्या एका समितीच्या मते, एप्रिलमध्ये पोलाद मागणी सर्वाधिक ३.४ टक्क्यांनी वाढली. मे आणि जूनमध्ये ही वाढ अनुक्रमे ०.३ टक्के आणि ०.९ टक्के एवढी होती. याच काळात तयार पोलादाचे उत्पादन १.५ टक्क्यांनी वाढून २.१८ कोटी टनावर गेले. भारत जगात चौथ्या क्रमांकाचा पोलाद उत्पादक म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षी देशात पोलादाचे ८.१ कोटी टन उत्पादन झाले होते.

Web Title: The demand for steel rose by 0.7 percent