Deep Diamond India Share: स्मॉलकॅप (Smallcap) आणि पेनी शेअर्समध्ये (Penny Shares) गुंतवणूकदारांची जबरदस्त आवड असल्यामुळे डीप डायमंड इंडियाचे शेअर्स सोमवारी सलग तिसऱ्या सत्रात ५% च्या अपर सर्किटवर पोहोचले. कंपनीचा शेअर भाव बीएसईवर (BSE) प्रति शेअर ₹८.२८ च्या नवीन ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर आला.
गेल्या तीन दिवसांपासून कंपनीच्या शेअर्सना सातत्याने अपर सर्किट लागत आहे, जे जोरदार खरेदी आणि मजबूत व्हॉल्यूम्स दर्शवते. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सुमारे ३५ लाख इक्विटी शेअर्सचा व्यवहार झाला, तर मागील एका महिन्याचा सरासरी ट्रेडिंग व्हॉल्यूम सुमारे २१ लाख शेअर्सचा राहिला आहे.
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
शेअर्समधील तेजीचं कारण
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, डीप डायमंडच्या शेअर्समधील ही तेजी बाजारात सुरू असलेल्या व्यापक तेजीशी देखील जोडलेली आहे. सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी ५० हे दोन्ही निर्देशांक अर्धा टक्क्यांहून अधिक वाढीसह ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते.
कंपनीनं आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीची तारीख जाहीर केली आहे. ही बैठक शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित केली जाईल. या बैठकीत बोर्ड सदस्य अंतरिम लाभांश जाहीर करण्याच्या आणि त्याच्या वितरणाच्या प्रस्तावावर विचार करतील. यासोबतच, बोर्ड फेरी ऑटोमोटिव्ह्स प्रायव्हेट लिमिटेड (Ferry Automotives Pvt. Ltd.) – जी कंपनीची सहकारी फर्म आहे, त्याच्या इक्विटी शेअर्समधील गुंतवणुकीला देखील मंजुरी देऊ शकतो. कंपनी सध्या दिलेलं कर्ज इक्विटीमध्ये रूपांतरित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करेल.
शेअर किमतीची कामगिरी
डीप डायमंड इंडियाच्या शेअर्सनी अलीकडच्या महिन्यांत गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. १ महिन्यात त्यानं ८९% ची झेप घेतली आहे. ३ महिन्यांत १०२% ची वाढ नोंदवली गेली आहे आणि ६ महिन्यांत ८७% ची तेजी दिसून आली आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून यात ३०% वाढ झाली आहे. ५ वर्षांत या शेअरनं ५३७% चा मल्टीबॅगर परतावा दिला आहे. कामकाजादरम्यान डीप डायमंडच्या शेअरला अजूनही ५% अप्पर सर्किट लागलं असून ते प्रति शेअर ₹८.२८ च्या पातळीवर होता. बाजार तज्ज्ञांचं मत आहे की जर कंपनीच्या बोर्ड बैठकीत अंतरिम लाभांश किंवा गुंतवणुकीच्या संदर्भात सकारात्मक निर्णय आला, तर आगामी सत्रांमध्ये शेअरमध्ये आणखी वाढ दिसून येऊ शकते.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
