Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > खासगी क्षेत्रातील उत्पादन निर्देशांकात घट

खासगी क्षेत्रातील उत्पादन निर्देशांकात घट

देशात खासगी क्षेत्रातील उत्पादनात एप्रिलमध्ये सलग दुसर्‍या महिन्यात मंदी बघायला मिळाली. सेवा क्षेत्रात घसरण झाली, असे एचएसबीसीने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले.

By admin | Updated: May 7, 2014 04:05 IST2014-05-07T03:50:51+5:302014-05-07T04:05:02+5:30

देशात खासगी क्षेत्रातील उत्पादनात एप्रिलमध्ये सलग दुसर्‍या महिन्यात मंदी बघायला मिळाली. सेवा क्षेत्रात घसरण झाली, असे एचएसबीसीने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले.

Decrease in the private sector output index | खासगी क्षेत्रातील उत्पादन निर्देशांकात घट

खासगी क्षेत्रातील उत्पादन निर्देशांकात घट

 उत्पादन सुचकांक ५0 च्याही खाली

नवी दिल्ली : देशात खासगी क्षेत्रातील उत्पादनात एप्रिलमध्ये सलग दुसर्‍या महिन्यात मंदी बघायला मिळाली. सेवा क्षेत्रात घसरण झाली, असे एचएसबीसीने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले. सेवा आणि बांधकाम क्षेत्राचा अभ्यास करणार्‍या एचएसबीसी इंडियाचा संयुक्त उत्पादन निर्देशांक एप्रिलमध्ये वाढून ४९.५ वर आला होता. मार्चमध्ये हा निर्देशांक ४८.९ एवढा होता. मार्च व एप्रिलमध्ये हा निर्देशांक ५० च्या आत राहिला. यावरून सलग दुसर्‍या महिन्यात उत्पादन दरात आकुंचन झाल्याचे स्पष्ट होते. यादरम्यान एचएसबीसीचा सेवा निर्देशांक मार्च व एप्रिलमध्ये अनुक्रमे ४७.५ व ४८.५ एवढा होता. हा निर्देशांकसुद्धा ५० पेक्षा कमी होता. एचएसबीसीचे प्रमुख अर्थतज्ज्ञ (भारत आणि आशिया) लीफ एस्कसेन म्हणाले की, उत्पादन निर्देशांकात सुधारणा झाल्या; पंरतु हे निर्देशांक ५०च्या आत आहेत. त्यामुळे दोन्ही क्षेत्रांत मंदीचे संकेत आहेत. सर्वेक्षणात सहभागी असणार्‍या कंपन्यांनी सांगितले की, आर्थिक नरमाई, लोकसभा निवडणूक आणि नव्या मागणीत होत असलेली घसरण ही नरमाईची प्रमुख कारणे होत. सर्वेक्षणानुसार सेवा क्षेत्रातील गरजेच्या वस्तूंचे भाव एप्रिल महिन्यात अधिक होते. खाद्य पदार्थ, पॅकेजिंग मटेरियल, इंधन आणि कागदासाठी सेवा पुरवठादारांनी अधिक पैसे दिले. उल्लेखनीय म्हणजे सप्टेंबर २०१३ मध्ये रघुराम राजन यांनी आरबीआयचे गव्हर्नरपद स्वीकारल्यानंतर तीन वेळा रेपोरेट वाढविले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Decrease in the private sector output index