Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘जुन्या तारखेच्या विक्रीकरासंदर्भात लवकरच निर्णय’

‘जुन्या तारखेच्या विक्रीकरासंदर्भात लवकरच निर्णय’

राज्यातील व्यापारउदिमाला चालना देण्यासाठी एलबीटी आणि विक्रीकराची जुनी वसुली रोखण्याच्या प्रश्नांसंदर्भात लवकरच योग्य तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली

By admin | Updated: May 29, 2014 04:07 IST2014-05-29T04:07:38+5:302014-05-29T04:07:38+5:30

राज्यातील व्यापारउदिमाला चालना देण्यासाठी एलबीटी आणि विक्रीकराची जुनी वसुली रोखण्याच्या प्रश्नांसंदर्भात लवकरच योग्य तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली

Decision on 'Old Date Sales' | ‘जुन्या तारखेच्या विक्रीकरासंदर्भात लवकरच निर्णय’

‘जुन्या तारखेच्या विक्रीकरासंदर्भात लवकरच निर्णय’

 मुंबई : राज्यातील व्यापारउदिमाला चालना देण्यासाठी एलबीटी आणि विक्रीकराची जुनी वसुली रोखण्याच्या प्रश्नांसंदर्भात लवकरच योग्य तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. भारतीय जनता पार्टीचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखालील एका व्यापारी मंडळाशी चर्चा करताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यामध्ये व्यापार्‍यांकडून जुन्या तारखेच्या कराची वसुली सुरू असल्याची तक्रार घेऊन लोढा यांनी आज पवार यांची भेट घेतली. यावेळी अशा प्रकरणांची माहिती देतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या अनुषंगाने सुमारे १५ वर्षे जुन्या सीएसटी कराच्या वसुलीचे परिपत्रक रोखण्याचीही मागणी त्यांनी केली. व्यापार्‍यांचे एकूण म्हणणे ऐकून घेतल्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी लोखंड व धातू यांच्यावरील कराची जुनी वसुली रोखण्यासंदर्भात शासन लवकरच आदेश काढेल आणि एलबीटीसह अन्य करांच्या मुद्यांसंदर्भात आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्याचे आश्वासन दिले. राज्यात एलबीटीवरून व्यापार्‍यांमध्ये नाराजी आहे याचा फटका लोकसभा निवडणुकीत आघाडीला बसल्याचे बोलले जात आहे.( प्रतिनिधी)

Web Title: Decision on 'Old Date Sales'