Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट

एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट

Bonus Shares News: बोनस शेअर्सवर लक्ष ठेवून असलेल्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एका कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना एकावर ४ बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतलाय. यापूर्वी कंपनीनं गुंतवणूकदारांनचे पैसे दुप्पटही केलेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 13:35 IST2025-12-27T13:35:57+5:302025-12-27T13:35:57+5:30

Bonus Shares News: बोनस शेअर्सवर लक्ष ठेवून असलेल्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एका कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना एकावर ४ बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतलाय. यापूर्वी कंपनीनं गुंतवणूकदारांनचे पैसे दुप्पटही केलेत.

CWD Ltd investor get 4 bonus shares for one Record date in the first week of 2026 this share has doubled its money in a year | एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट

एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट

Bonus Shares News: बोनस शेअर्सवर लक्ष ठेवून असलेल्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सीडब्ल्यूडी लिमिटेड (CWD Ltd) कंपनीनं बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. कंपनीनं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक १ शेअरवर ४ बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या एका वर्षात सीडब्ल्यूडी लिमिटेडच्या शेअर्सच्या किमतीत १०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली, ज्यामुळे पोझिशनल गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत.

रेकॉर्ड डेट आणि बोनसचा तपशील

शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, सीडब्ल्यूडी लिमिटेडनं स्पष्ट केलंय की पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर ४ बोनस शेअर्स मिळतील. या बोनस शेअरसाठी २ जानेवारी २०२६ ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित करण्यात आली आहे. याचा अर्थ, जर तुम्हाला या बोनस शेअरचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला १ जानेवारीपर्यंत हे शेअर्स खरेदी करावे लागतील. विशेष म्हणजे, कंपनीनं पहिल्यांदाच गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतलाय.

एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम

शेअर बाजारातील कामगिरी

शुक्रवारी सीडब्ल्यूडी लिमिटेडचा शेअर ३.२९ टक्क्यांच्या घसरणीसह १८३१.६५ रुपयांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या तीन महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत १० टक्क्यांची वाढ झाली आहे, तर गेल्या एका वर्षात शेअर्सचा भाव १३१ टक्क्यांनी वधारला आहे. कंपनीच्या शेअरची ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळी २०८५ रुपये आणि नीचांकी पातळी ७६० रुपये आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप ८०५ कोटी रुपये इतकं आहे.

प्रमोटर्सचा हिस्सा कमी

सप्टेंबरच्या शेअर होल्डिंग आकडेवारीनुसार, कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी ५९.४० टक्के होती. यापूर्वी जुलैमध्ये प्रमोटर्सकडे ६०.९३ टक्के हिस्सा होता. म्हणजेच पहिल्या ते दुसऱ्या तिमाहीच्या दरम्यान प्रमोटर्सनी आपले शेअर्स विकले आहेत. सप्टेंबर २०२५ च्या शेअर होल्डिंग डेटावरून असे दिसून येतं की, कंपनीमध्ये सार्वजनिक गुंतवणूकदारांचा हिस्सा ४०.६० टक्के होता.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : सीडब्ल्यूडी लिमिटेड दे रहा है 4 बोनस शेयर; एक साल में स्टॉक हुआ दोगुना

Web Summary : सीडब्ल्यूडी लिमिटेड ने 2 जनवरी, 2026 की रिकॉर्ड तिथि के साथ 1:4 बोनस शेयर जारी करने की घोषणा की। निवेशकों को पात्र होने के लिए 1 जनवरी तक शेयर खरीदने होंगे। एक साल में स्टॉक 131% बढ़ा है, जिससे निवेशकों का पैसा दोगुना हो गया है। प्रमोटरों ने अपनी हिस्सेदारी थोड़ी कम कर दी है।

Web Title : CWD Ltd Offers 4 Bonus Shares; Stock Doubles in a Year

Web Summary : CWD Ltd announced a 1:4 bonus share issue with a record date of January 2, 2026. Investors must buy shares by January 1st to be eligible. The stock has surged 131% in a year, doubling investors' money. Promoters have slightly reduced their stake.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.