Crizac Ltd IPO Listing Today: बुधवार, ९ जुलै रोजी क्रिझॅक लिमिटेडचा आयपीओ शेअर बाजारात लिस्ट झाला. शेअर बाजारातील वाढत्या अस्थिरतेदरम्यान बीटूबी एज्युकेशन प्लॅटफॉर्म क्रिझॅक लिमिटेडच्या शेअरनं जबरदस्त एन्ट्री घेतली. एनएसईवर हा शेअर २४५ रुपयांच्या इश्यू प्राइसपेक्षा १४.७१ टक्क्यांनी वाढून २८१.०५ रुपयांवर लिस्ट झाला. लिस्टिंगनंतर तो ३ टक्क्यांपर्यंत वधारला आणि २८८.५० रुपयांच्या इंट्राडे उच्चांकी पातळीवर पोहोचला.
गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद
क्रिझॅकच्या आयपीओला क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (क्यूआयबी) श्रेणीत एकूण १३४.३५ पट, तर नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (एनआयआय) सेगमेंटमध्ये ७६.१५ पट बोली लागली. तर, किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीत १०.२४ पट सबस्क्रिप्शन मिळालं. पहिल्या दिवशी केवळ ०.४८ पट बोली आल्या, तर दुसऱ्या दिवशी २.८९ पट बोली आल्या. यानंतर शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांनी भरपूर पैसे गुंतवले. कंपनीनं आयपीओचा प्राइस बँड २३३ ते २४५ रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान ६१ शेअर्स खरेदी करण्यासाठी १४,९४५ रुपयांची गुंतवणूक करावी लागली.
धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
काय करते कंपनी?
क्रिझॅक लिमिटेड (Crizac IPO) हा एक बी२बी एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे. त्याची स्थापना २०११ मध्ये झाली. ही कंपनी युनायटेड किंग्डम, कॅनडा, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या देशांमध्ये उच्च शिक्षणासाठी स्टुडंट रिक्रुटमेंट सोल्युशन प्रोव्हायडर म्हणून काम करते. कंपनीच्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२४ पर्यंत, जगभरात त्यांचे सुमारे ७,९०० एजंट आहेत, तर त्यांनी ५.९५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज प्रोसेस केलेत. कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी ९५ टक्के उत्पन्न लंडनमधून येतं.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)