Mumbai News: जी महिला मुंबईत घर खरेदी करेल, त्या महिलेला किंमतीत २ लाख रुपयांची अतिरिक्त सवलत देण्याचा निर्णय कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया-महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्टीने घेतला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
CREDAI-MCHIने एक्स्पो आयोजित केला असून, १७ ते १९ जानेवारी दरम्यान होणार आहे. या एक्स्पोमध्ये सहभागी होणाऱ्या बिल्डर्सकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींव्यतिरिक्त ही सवलत असणार आहे, अशी माहिती CREDAI-MCHIचे सविच धवल अजमेरा यांनी दिली.
या एक्स्पोमध्ये घर खरेदी करणाऱ्यांना विशेष सवलती दिल्या जाणार आहेत. यात स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटीसह तब्बल १८ लाख रुपयांपर्यंत सवलतींचा समावेश आहे.
500 पेक्षा जास्त प्रोजेक्टचे प्रदर्शन
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, CREDAI-MCHI च्या वतीने मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये ३२वे प्रॉपर्टी अँड हाऊसिंग फायनान्स एक्झबिशन आयोजित करण्यात आले आहे. यात १०० पेक्षा अधिक विकासक सहभागी होणार असून, ते ५०० पेक्षा अधिक प्रोजेक्ट प्रदर्शनात मांडणार आहेत.
प्रदर्शनात पहिल्यांच पिंक संडे आयोजित करण्यात आलेला आहे. १९ जानेवारी रोजी पिंक संडे आहे. महिलांनी स्वतःच्या नावावर घर खरेदी करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम रावबला जाणार आहे.
CREDAI-MCHIचे अध्यक्ष डोमिनिक रोमेल यांनी सांगितले की, या वर्षी प्रदर्शनात घर खरेदीची प्रक्रिया सोपी केली जाणार आहे. १० मिनिटांत घराची नोंदणी करण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे.
CREDAIचे राष्ट्रीय अध्यक्ष बोमन इराणी म्हणाले की, हे प्रदर्शन रिअल इस्टेट इंडस्टीचे आधुनिक आणि एकसंघ असल्याचे प्रतिक आहे.