lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Covishield Price : दुसऱ्या टप्प्यात सरकारला स्वस्त मिळाली कोरोनाची लस; जाणून घ्या लसीची किंमत आहे तरी काय

Covishield Price : दुसऱ्या टप्प्यात सरकारला स्वस्त मिळाली कोरोनाची लस; जाणून घ्या लसीची किंमत आहे तरी काय

CoronaVaccine News & Latest Updates : उत्पादन वाढल्यामुळे कोरोना लसीची किंमतही कमी करण्यात आली आहे. आता सरकारकडून दुसऱ्या टप्प्यातील कोविशिल्डची (Covishield) ची ऑर्डर दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 03:46 PM2021-03-11T15:46:26+5:302021-03-11T16:04:44+5:30

CoronaVaccine News & Latest Updates : उत्पादन वाढल्यामुळे कोरोना लसीची किंमतही कमी करण्यात आली आहे. आता सरकारकडून दुसऱ्या टप्प्यातील कोविशिल्डची (Covishield) ची ऑर्डर दिली आहे.

Covishield Price : Corona vaccine price reduced one shot for rs 150 for second phase | Covishield Price : दुसऱ्या टप्प्यात सरकारला स्वस्त मिळाली कोरोनाची लस; जाणून घ्या लसीची किंमत आहे तरी काय

Covishield Price : दुसऱ्या टप्प्यात सरकारला स्वस्त मिळाली कोरोनाची लस; जाणून घ्या लसीची किंमत आहे तरी काय

कोरोना व्हायरसविरोधात लसीकरण सुरू होताच लोकांमध्ये सकारात्मक वातावरण तयार झालं, पण अजूनही कोरोना व्हायरस पाठ सोडत नसल्यानं अनेक ठिकाणी लॉकडाऊनची स्थिती पुन्हा  येऊ शकते.  जसजसी देशभरात कोरोना लसीची मागणी वाढत आहे. त्याचप्रमाणे उत्पादनही वाढत आहे.  उत्पादन वाढल्यामुळे कोरोना लसीची किंमतही कमी करण्यात आली आहे. आता सरकारकडून दुसऱ्या टप्प्यातील कोविशिल्डची (Covishield) ची ऑर्डर दिली आहे.

त्यातील एक डोसची किंमत १५० रूपये आहे. पण ५ टक्के जीएसटीसुद्धा (Goods and Service Tax)  द्यावा लागणार आहे. म्हणजेच लसीच्या एका डोसची किंमत १५७.५० रुपये इतकी असेल. याआधी जानेवारीमध्ये ऑर्डर देण्यात आली होती.  त्यावेळी लसीच्या एका शॉटची किंमत २१० रूपये इतकी होती

कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात लसीच्या डोसची ऑर्डर वाढलेली आहे. याचा फायदा सगळ्यांनाच मिळाला आहे.  आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी इकोनॉमिक्स टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात जी ऑर्डर देण्यात आली आहे. त्यात किमतीत सुट मिळाली आहे. 

पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियानं या टप्प्यातील एका डोसचे वितरण १५० रूपयांमध्ये करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. त्यात ५ टक्के जीएसटीसुद्धा लागणार आहे.  म्हणजेच लसीच्या एक डोसची किंमत १५७.५० रूपये असेल. ही किंमत जगभरातील इतर लसींच्या तुलनेत कमीत कमी असल्याचे  सांगितले जात आहेत. या टप्प्यात  किती शॉट्सची ऑर्डर दिली आहे. याबाबत माहिती समोर आलेली नाही.

हे आहे जगातील सर्वात महाग औषध, १८ कोटी रूपयांच्या एका डोजने दूर होणार दुर्मीळ आजार...

जगातील सगळ्यात मोठ्या लसीकरण अभियानासाठी जानेवारी महिन्यात पहिल्या टप्प्यातील ऑर्डर देण्यात आल्या होत्या. त्यावेळी सरकारनं सीरम इंस्टिट्यूट आणि भारत बायोटेककडून सहा कोटी डोज घेण्याची ऑर्डर दिली होती. पहिल्या टप्प्यात तीन ते चार कोटी कोरोना योद्ध्यांना लस देण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ नागरिकांना लस देण्याचा सराकारचा विचार असून यासाठी सरकारला १३०० कोटी रूपये खर्च करावा लागत आहे. उल्लेखनीय बाब अशी की, सीरमकडून विकत घेण्यात येत असलेल्या प्रत्येक लसीची किंमत  जीएसटी मिळून २१० रूपये इतकी होती. याव्यतिरिक्त भारत बायोटेकच्या आधी पहिल्या टप्प्यात खरेदी केल्या गेलेल्या ५५ लाख कोवॅक्सिनचे डोससाठी १६२ कोटी रूपये मोजावे लागले होते.

खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रे २४ तास सुरु ठेवणार

 कोरोनाची (CoronaVirus) लागण होण्याचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांना असल्यामुळे लसीकरण मोहिमेला वेग मिळावा, यासाठी खाजगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रे (vaccination centers) आठवड्याचे सातही दिवस २४ तास सुरु ठेवण्याची परवानगी महापालिका देणार आहे. त्यानुसार दररोज एक लाख व्यक्तींचे लसीकरण झाल्यास महिन्याभरात मुंबईतील बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. (Permission to continue vaccination centers in private hospitals for 24 hours)

सर्वाधिक महिला होताहेत कोरोना लसीच्या साईड इफेक्ट्सच्या शिकार; सीडीसीचा संशोधनातून खुलासा

मुंबईत १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत एक लाख ३६ हजार ४९१ लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच ४५ ते ५९ या वयोगटातील सहव्याधी असलेल्या १५ हजार २७२ नागिरकांना लस देण्यात आली आहे. सध्या सुरु असणारी केंद्रे ही आठ ते १२ तास या कालावधीसाठी कार्यरत आहेत. 

Web Title: Covishield Price : Corona vaccine price reduced one shot for rs 150 for second phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.