lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > महागाईची आणखी झळ बसणार; व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ!, जाणून घ्या नवीन दर

महागाईची आणखी झळ बसणार; व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ!, जाणून घ्या नवीन दर

LPG Price Hike :  घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 09:46 AM2023-07-04T09:46:27+5:302023-07-04T09:51:15+5:30

LPG Price Hike :  घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

commercial lpg price increased by 7-rupees, no change in domestic lpg price | महागाईची आणखी झळ बसणार; व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ!, जाणून घ्या नवीन दर

महागाईची आणखी झळ बसणार; व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ!, जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक  (कमर्शियल) एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ७ रुपयांनी वाढ केली आहे. ANI वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ किंमत १७७३ रुपयांवरून १७८० रुपयांपर्यंत वाढली आहे. 

दरम्यान, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. विशेष म्हणजे, सलग तीन वेळा किमतीत कपात केल्यानंतर व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. एप्रिल, मे आणि जूनमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी झाल्या. मात्र, मार्चमध्ये व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत मोठी वाढ झाली होती.

१ जून २०२३ रोजी तेल विपणन कंपन्यांनी एलपीजीच्या किमतीत ८३ रुपयांनी कपात केली होती. यानंतर दिल्लीत त्याची किंमत १७७३ रुपयांवर गेली होती. मे महिन्यात सुद्धा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १७२ रुपयांनी स्वस्त झाले होते. यानंतर दिल्लीत १९ किलोच्या सिलिंडरची किंमत १८५६.५० रुपये झाली होती. एप्रिलमध्येही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ९२ रुपयांनी कपात करण्यात आली होती. मात्र, मार्चमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत जवशपास ३५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल नाही
घरगुती वापरासाठीच्या १४.२ किलो सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. या सिलिंडरच्या किंमतीतील शेवटचा बदल १ मार्च २०२३ रोजी झाला होता. त्यानंतर सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी स्वस्त करण्यात आली. दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ११०३ रुपये आहे. याचबरोबर, कोलकातामध्ये ११२९ रुपये, चेन्नईमध्ये १११८.५० रुपये आणि मुंबईमध्ये १११२.५० रुपये प्रति सिलिंडर मिळत आहे.

दरम्यान, व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत वाढ अशा वेळी झाली आहे, जेव्हा टोमॅटोने लोकांच्या स्वयंपाकघराचे बजेट आधीच बिघडवले आहे. टोमॅटोचा भाव १०० रुपये किलोवर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांना महागाईची झळ आणखी बसणार असल्याचे दिसून येते.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: commercial lpg price increased by 7-rupees, no change in domestic lpg price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.