Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > वाणिज्य - एडीसीसी अकॅडमीतर्फे कार्यशाळा आयोजित

वाणिज्य - एडीसीसी अकॅडमीतर्फे कार्यशाळा आयोजित

साईज ७ बाय २.....

By admin | Updated: June 20, 2014 21:25 IST2014-06-20T21:25:03+5:302014-06-20T21:25:03+5:30

साईज ७ बाय २.....

Commerce-organized workshop organized by the ADCC Academy | वाणिज्य - एडीसीसी अकॅडमीतर्फे कार्यशाळा आयोजित

वाणिज्य - एडीसीसी अकॅडमीतर्फे कार्यशाळा आयोजित

ईज ७ बाय २.....

नागपूर : एडीसीसी आयएएस अकॅडमीतर्फे फाऊंडेशन कोर्सला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नुकतीच कार्यशाळा आयोजित करण्यात आली. ही कार्यशाळा स्पर्धा परीक्षांवर आधारित होती. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, परीक्षांचे स्वरूप व अभ्यासाचा आराखडा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. केंद्रीय लोकसेवा आयोग व त्यांची विचारधारा यावरही प्रकाश टाकण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना आयोगाचे प्रश्न समजून घेण्यास फायदा झाला. परीक्षांसंदर्भातील अफवा व शंका दूर करण्यात आल्या. विषयांच्या अचूक विश्लेषणामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजून घेण्यास मदत झाली. कार्यशाळेत विविध पार्श्वभूमीचे ५० वर विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाच्या उच्च दर्जाचा अनुभव मिळाला. एडीसीसी अकॅडमी अमरावती येथे नवीन शाखा सुरू करणार आहे. याची घोषणा कार्यशाळेत करण्यात आली. कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली. विद्यार्थी उंचावलेले मनोधैर्य घेऊन घरी परतले. यानंतरही चर्चासत्र व कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती अकॅडमीच्यावतीने देण्यात आली.

Web Title: Commerce-organized workshop organized by the ADCC Academy