Lokmat Money > बिझनेस न्यूज > CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!

CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!

CNG-PNG Price : सरकारने गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच वाहनांसाठी सीएनजी आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या किमती कमी केल्या आहेत. लवकरच सर्वसामान्य ग्राहकांना याचा फायदा मिळेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 16:03 IST2025-06-01T16:01:32+5:302025-06-01T16:03:28+5:30

CNG-PNG Price : सरकारने गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच वाहनांसाठी सीएनजी आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या किमती कमी केल्या आहेत. लवकरच सर्वसामान्य ग्राहकांना याचा फायदा मिळेल.

cng png prices may fall soon government reduced apm prices for the first time in two years | CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!

CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!

CNG-PNG Price : लवकरच सामान्य नागरिकांना सीएनजी आणि पीएनजीच्या किमतींमध्ये मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारत सरकारने तब्बल दोन वर्षांत प्रथमच सीएनजी आणि पीएनजीच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या किमती कमी केल्या आहेत, जे बेंचमार्क दरांमधील घट दर्शवते. गेल्या महिन्यात दिल्ली-एनसीआरसह अनेक शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत वाढ झाली असताना, आता या कपातीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नैसर्गिक वायूच्या किमतीत मोठी कपात!
पेट्रोलियम मंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण कक्षाने (PPAC) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील ओएनजीसीला लिलावाशिवाय वाटप केलेल्या वारसा किंवा जुन्या क्षेत्रांमधून मिळणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत 6.75 डॉलर वरून 6.41 डॉलर प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिट्स (MMBTU) पर्यंत कमी करण्यात आली आहे. एप्रिल २०२३ मध्ये सरकारने अशा गॅसच्या किमतीसाठी नवीन फॉर्म्युला आणल्यानंतरची ही पहिलीच कपात आहे.

या निर्णयामुळे इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL), महानगर गॅस लिमिटेड (MGL) आणि अदानी-टोटल गॅस लिमिटेड (Adani-Total Gas Ltd) सारख्या शहरी गॅस किरकोळ विक्रेत्यांना मोठा फायदा होईल, जे वाढत्या उत्पादन खर्चामुळे दबावाखाली होते.

२०२३ मध्ये निश्चित झाले होते नवीन सूत्र
एप्रिल २०२३ मध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळाने एका तज्ञ समितीचा अहवाल स्वीकारला होता. त्यानुसार, एपीएम गॅस नावाच्या जुन्या क्षेत्रांमधून मिळणाऱ्या वायूची किंमत मासिक आधारावर कच्च्या तेलाच्या मासिक सरासरी आयात किमतीच्या १० टक्के निश्चित करण्याची शिफारस करण्यात आली होती. यामध्ये प्रति १० लाख ब्रिटिश थर्मल युनिट्ससाठी किमान चार डॉलर्स आणि कमाल ६.५ डॉलर्सची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. विशेष म्हणजे, ही कमाल किंमत दोन वर्षांसाठी अपरिवर्तित राहायची आणि नंतर दरवर्षी 0.25 डॉलरने वाढायची होती. याच सूत्रानुसार, एप्रिल २०२५ मध्ये कमाल किंमत प्रति युनिट ६.७५ डॉलरपर्यंत वाढली होती.

CNG आणि PNG च्या किमती २-३ रुपयांनी कमी होणार?
सरकारच्या या निर्णयानंतर, केवळ किरकोळ विक्रेत्यांनाच नव्हे, तर ग्राहकांनाही मोठा फायदा मिळेल. तज्ज्ञांच्या मते, या कपातीमुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमती २ ते ३ रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात.

वाचा - गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?

गेल्या महिन्यात दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत वाढ झाली होती. दिल्लीत सीएनजीच्या किमतीत एक रुपयाने वाढ होऊन ती ७६.०९ रुपये प्रति किलो झाली होती. तर नोएडा आणि गाझियाबाद सारख्या शहरांमध्ये किंमत प्रति किलो ३ रुपयांनी वाढून ८४.७० रुपये झाली होती. आता मात्र या दरवाढीवर लगाम लागण्याची शक्यता आहे.

Web Title: cng png prices may fall soon government reduced apm prices for the first time in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.