Gold Silver Price: येत्या काही महिन्यांत चांदीच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सिटीग्रुपच्या तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की चांदीच्या किमती १३ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. लेटन आणि इतर तज्ञांच्या अंदाजानुसार सोन्याच्या किमती २५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात, म्हणजेच सोन्याच्या किमती ३००-५०० डॉलर्सपर्यंत कमी होण्याची शक्या वर्तवण्यात येत आहे.
चांदीच्या किमती वाढल्या
भौतिक पुरवठा कमी होत असल्यानं आणि गुंतवणुकीची मागणी वाढल्यानं येत्या काही महिन्यांत चांदीच्या किमती प्रति औंस ४० डॉलरच्या वर जाण्याची अपेक्षा सिटीग्रुपच्या विश्लेषकांनी व्यक्त केलीये. सिटीग्रुपच्या विश्लेषकांनी चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे, २०२५ मध्ये यात १३ टक्क्यांच्या वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. चांदीच्या पुरवठ्यात घट आणि गुंतवणूक मागणीत वाढ यामुळे हा अंदाज व्यक्त केलाय. जागतिक चांदी बाजारात, ज्याचं मूल्य ३० अब्ज डॉलर्स आहे आणि सलग पाचव्या वर्षी पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक असण्याची अपेक्षा आहे. मागणी १.०५ अब्ज औंसच्या पुरवठ्याच्या तुलनेत १.२० अब्ज औंस होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
अल्पावधीत वाढीची शक्यता
सिटीच्या अंदाजानुसार, चांदीच्या किमती अल्पावधीत ५ टक्क्यांनी वाढून ४० डॉलर्स होतील आणि पुढील ६-१२ महिन्यांत १३ टक्क्यांनी वाढून ४३ डॉलर्सपर्यंत जातील असा अंदाज सिटीनं व्यक्त केलाय. सोने आणि चांदीचं गुणोत्तर पाहिलं तर चांदीच्या किमतीत वाढ दर्शवत आहे. जानेवारीमध्ये सोन्या-चांदीचं गुणोत्तर १०० च्या आसपास होतं, ते आता ८५ पर्यंत घसरलंय. दीर्घकालीन सरासरी सोने-चांदी गुणोत्तर ७० आहे. यावरुन चांदीच्या दरात अजूनही तेजी येण्याची शक्यता असल्याचं दिसून येतंय.
सोन्याच्या किमतीत २५% घट होण्याची शक्यता
सिटीनं सोन्याच्या फ्युचर्सबाबत तितकीशी आशावादी नाही. याचं कारण म्हणजे मध्यवर्ती बँकांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे आणि एक्सचेंज-ट्रेडेड फंडच्या (ETF) प्रवाहामुळे २०२५ पर्यंत सोन्याच्या फ्युचर्समध्ये २७% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
सोन्याच्या किमती त्यांच्या विक्रमी वाढीनंतर लवकरच कमी होतील आणि येत्या तिमाहीत सोनं ३,००० डॉलर्सच्या खाली येईल, असं भाकित सिटीनं जून महिन्यात केलं होतं. पुढील तिमाहीत सोनं ३,००० डॉलर्सच्या वर स्थिर राहील आणि पुढच्या वर्षी त्या पातळीपेक्षा खाली येईल असा अंदाज सिटीनं कायम ठेवलाय. लेटन आणि इतर विश्लेषकांच्या अंदाजानुसार २०२६ च्या दुसऱ्या सहामाहीत सोनं २,५००-२,७०० डॉलर्सच्या श्रेणीत (२५% घट) राहील.