Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > भायखळा-विद्याविहारसह हार्बरच्या कुर्ला-वाशी मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक बोरीवली-गोरेगाव मार्गावर पि›म रेल्वेचा जंबोब्लॉक

भायखळा-विद्याविहारसह हार्बरच्या कुर्ला-वाशी मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक बोरीवली-गोरेगाव मार्गावर पि›म रेल्वेचा जंबोब्लॉक

ठाणे - भायखळा-विद्याविहार या स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गासह हार्बरच्या कुर्ला-वाशी स्थानकादरम्यान अप/डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक स. ११ ते संध्या. ४ या कालावधीत आहे.

By admin | Updated: June 20, 2014 21:24 IST2014-06-20T21:24:56+5:302014-06-20T21:24:56+5:30

ठाणे - भायखळा-विद्याविहार या स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गासह हार्बरच्या कुर्ला-वाशी स्थानकादरम्यान अप/डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक स. ११ ते संध्या. ४ या कालावधीत आहे.

Central Railway on the Kurla-Vashi road between Byculla and Vidyavihar on the mega block of Borivli-Goregaon | भायखळा-विद्याविहारसह हार्बरच्या कुर्ला-वाशी मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक बोरीवली-गोरेगाव मार्गावर पि›म रेल्वेचा जंबोब्लॉक

भायखळा-विद्याविहारसह हार्बरच्या कुर्ला-वाशी मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक बोरीवली-गोरेगाव मार्गावर पि›म रेल्वेचा जंबोब्लॉक

णे - भायखळा-विद्याविहार या स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गासह हार्बरच्या कुर्ला-वाशी स्थानकादरम्यान अप/डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक स. ११ ते संध्या. ४ या कालावधीत आहे.
त्यामुळे मुख्य मार्गावरील डाऊन धीम्या गाड्या ब्लॉकच्या कालावधीत डाऊन जलद गतीवर वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकल परेल, दादर, सायन,माटुंगा आणि कुर्ला स्थानकात थांबतील, विद्याविहारनंतर त्या पुन्हा धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.
हार्बरच्या कुर्ला-वाशी अप/डाऊन दोन्ही मार्गावर रविवारी सकाळी ११ ते दु.३ या वेळेत ब्लॉक आहे. त्यामुळे या कालावधीत सीएसटीहून वाशी साठी सुटणार्‍या आणि वाशीहून सीएसटीसाठी सुटणार्‍या लोकल रद्द करण्यात येणार आहेत. प्रवाशांची गैरसोय कमी व्हावी यासाठी सीएसटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल या मार्गावर विशेष लोकल सोडण्यात येतील. तसेच प्रवाशांना ट्रान्स हार्बर मार्गे ठाणे-वाशी मार्गावर आहे त्याच तिकिटावर प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
बोरीवली-गोरेगाव मार्गावर पि›म रेल्वेचा जंबो ब्लॉक
ठाणे : रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा, आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीच्या कामासाठी रविवारी बोरीवली - गोरेगाव या स्थानकांदरम्यान अप/डाऊनच्या धीम्या मार्गावर पि›म रेल्वेचा जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक स. १०.३५ ते दु. ३.३५ या कालावधीत असून त्याकाळात वरील मार्गाच्या लोकल जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.
===========

Web Title: Central Railway on the Kurla-Vashi road between Byculla and Vidyavihar on the mega block of Borivli-Goregaon