Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > उत्तराखंडचे दरडोई उत्पन्न एक लाखावर

उत्तराखंडचे दरडोई उत्पन्न एक लाखावर

उत्तराखंडातील दरडोई उत्पन्न वार्षिक एक लाख रुपयांच्यावर गेले असून, राष्ट्रीय स्तरावर मात्र दरडोई उत्पन्नाचा आकडा अजूनही ७५ हजार रुपयांपेक्षाही कमी आहे

By admin | Updated: July 14, 2014 01:22 IST2014-07-14T01:22:28+5:302014-07-14T01:22:28+5:30

उत्तराखंडातील दरडोई उत्पन्न वार्षिक एक लाख रुपयांच्यावर गेले असून, राष्ट्रीय स्तरावर मात्र दरडोई उत्पन्नाचा आकडा अजूनही ७५ हजार रुपयांपेक्षाही कमी आहे

Per capita income of Uttarakhand yielded one lakh | उत्तराखंडचे दरडोई उत्पन्न एक लाखावर

उत्तराखंडचे दरडोई उत्पन्न एक लाखावर

डेहराडून: उत्तराखंडातील दरडोई उत्पन्न वार्षिक एक लाख रुपयांच्यावर गेले असून, राष्ट्रीय स्तरावर मात्र दरडोई उत्पन्नाचा आकडा अजूनही ७५ हजार रुपयांपेक्षाही कमी आहे.
राज्याच्या वित्त आणि सांख्यिकी संचालनालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार राज्याचा आर्थिक वृद्धी दरही राष्ट्रीय स्तरावरील ४.६ टक्क्यांच्या तुलनेत ५.६५ टक्के आहे.
१,०१,१६,७५२ लोकसंख्या असलेल्या उत्तराखंडातील दरडोई उत्पन्न वार्षिक १,०३,३४९ रुपये आहे. मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत उत्तराखंडातील दरडोई उत्पन्नात वार्षिक ११,३५८ रुपयांची वाढ झाली आहे. २०१२-१३ मध्ये या राज्यातील दरडोई उत्पन्न वार्षिक ९२,१९१ रुपये होते, अशी माहिती राज्याच्या वित्त आणि सांख्यिकी संचालक वाय. एस. पांगती यांनी दिली.
राज्याच्या आर्थिक वृद्धी दरातही मागच्या वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात उत्तराखंडचा आर्थिक वृद्धी दर ५.६१ टक्के होता, तो यावर्षी ५.६५ टक्क्यांवर गेला आहे. कृषी, उद्यान, पशुपालन, वन, खाण, जलसंधारण, परिवहन, वीज आणि स्थानिक संस्थांकडून पुरविण्यात आलेल्या माहितीच्या आधारे ही उपरोक्त आकडेवारी जारी करण्यात आलेली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Per capita income of Uttarakhand yielded one lakh