lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बारमाही चालणारा 'हा' व्यवसाय, दर महिन्याला होईल बंपर कमाई, सरकारी मिळेल मदत 

बारमाही चालणारा 'हा' व्यवसाय, दर महिन्याला होईल बंपर कमाई, सरकारी मिळेल मदत 

Business Idea : मुरमुरे मेकिंग बिझनेस (Murmura Making Business) म्हणजेच लाय बनवण्याच्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 04:00 PM2023-02-28T16:00:04+5:302023-02-28T16:03:45+5:30

Business Idea : मुरमुरे मेकिंग बिझनेस (Murmura Making Business) म्हणजेच लाय बनवण्याच्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत.

business idea murmura making business earn lakh of rupees every month | बारमाही चालणारा 'हा' व्यवसाय, दर महिन्याला होईल बंपर कमाई, सरकारी मिळेल मदत 

बारमाही चालणारा 'हा' व्यवसाय, दर महिन्याला होईल बंपर कमाई, सरकारी मिळेल मदत 

नवी दिल्ली : जर तुम्हाला आठ-नऊ तास जॉब करून कंटाळा आला असेल किंवा तुम्हाला नोकरी करायची नसेल आणि तुम्ही व्यवसायाच्या शोधात असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. दरम्यान, आम्‍ही तुम्‍हाला एका फूड प्रोडक्‍टबद्दल सांगत आहोत, त्याच्या व्‍यवसायातून तुम्‍ही दरमहा लाखोंची कमाई आरामात करू शकता. आम्ही मुरमुरे मेकिंग बिझनेस (Murmura Making Business) म्हणजेच लाय बनवण्याच्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत.

Puffed Rice ला हिंदीत मुरमुरा किंवा लाय म्हणतात. पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमध्ये झाल मुर्ही म्हणून मुरमुराला अधिक पसंती दिली जाते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पाककृतींसह वेगवेगळ्या ठिकाणी ते तयार केले जाते. मुंबईत ती भेळपुरी म्हणून खाल्ली जाते तर बंगळुरूमध्ये चुरमुरी म्हणून खाल्ली जाते. मंदिरात प्रसाद म्हणून फुगलेला तांदूळही वापरला जातो. मुरमुरा म्हणजे लाय हे देशाच्या कानाकोपऱ्यात खाल्ले जाते. गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकजण ते अगदी आवडीने खातात. एवढेच नाही तर त्याचा वापर स्ट्रीट फूड म्हणूनही केला जातो.

किती येईल खर्च?
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) ग्रामोद्योग रोजगार योजनेंतर्गत मुरमुरा उत्पादन युनिट स्थापन करण्याबाबत प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या प्रकल्प अहवालानुसार, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण 3.55 लाख रुपये खर्च येईल. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसल्यास, प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घेता येईल. तुम्ही या प्रकल्पाच्या खर्चावर आधारित कर्जासाठी अर्ज करू शकता. 

कच्चा माल
मुरमुरा बनवण्यासाठी वापरला जाणारा मुख्य कच्चा माल म्हणजे भात किंवा तांदूळ. हा कच्चा माल तुमच्या जवळच्या शहरात किंवा गावात सहज उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या धान बाजारातून घाऊक दराने देखील खरेदी करू शकता. धानाचा दर्जा चांगला असल्यास मुरमुरा चांगला तयार होतो.

लायसन्स
मुरमुरा किंवा लाय बनवणे हे अन्नपदार्थांतर्गत येते. त्यामुळे, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच FSSAI कडून फूड लायसन्स मिळवावे लागेल. याशिवाय, तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी नाव देखील निवडू शकता. त्या नावाने व्यवसाय नोंदणी आणि जीएसटी नोंदणी देखील करावी लागेल. तुम्ही तुमच्या कंपनीच्या ब्रँड नावाचा लोगो बनवू शकता आणि पॅकेटवर प्रिंटही करू शकता.

कमाई
मुरमुरा किंवा लाय बनवण्यासाठी 10 ते 20 रुपये प्रतिकिलो खर्च येतो. किरकोळ दुकानदार 40 ते 45 रुपयांना विकतात. 30-35 रुपये प्रति किलो या घाऊक दराने विकू शकता. किरकोळ विक्री करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. एकूणच या व्यवसायातून तुम्ही घरबसल्या लाखो रुपये कमवू शकता.

Web Title: business idea murmura making business earn lakh of rupees every month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.