lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > BSNL'चा मोठा धमाका! या दिवसापासून मोबाईल, इंटरनेट अन् ब्रॉडबँड सेवा स्वस्तात देणार

BSNL'चा मोठा धमाका! या दिवसापासून मोबाईल, इंटरनेट अन् ब्रॉडबँड सेवा स्वस्तात देणार

सध्याचं युग हे डिजिटल युग म्हणून ओळखलं जातं. इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या भारतात मोठ्या प्रमाणात आहे. BSNL ही देशातली सर्वात जुनी टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीचे देशभरात मोठं जाळं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 03:16 PM2024-02-13T15:16:44+5:302024-02-13T15:19:34+5:30

सध्याचं युग हे डिजिटल युग म्हणून ओळखलं जातं. इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या भारतात मोठ्या प्रमाणात आहे. BSNL ही देशातली सर्वात जुनी टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीचे देशभरात मोठं जाळं आहे.

BSNL From this day, mobile, internet and broadband services will be provided cheaply | BSNL'चा मोठा धमाका! या दिवसापासून मोबाईल, इंटरनेट अन् ब्रॉडबँड सेवा स्वस्तात देणार

BSNL'चा मोठा धमाका! या दिवसापासून मोबाईल, इंटरनेट अन् ब्रॉडबँड सेवा स्वस्तात देणार

सध्याचं युग हे डिजिटल युग म्हणून ओळखलं जातं. इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या भारतात मोठ्या प्रमाणात आहे. BSNL ही देशातली सर्वात जुनी टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीचे देशभरात मोठं जाळं आहे.  BSNL आता आपल्या ग्राहकांना मोठं गिफ्ट देणार आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई तसेच गुरुग्राम, गाझियाबाद, नोएडा, पाटणा, लखनौ आणि रायपूर यांसारख्या शहरांतील मोबाईल, इंटरनेट आणि ब्रॉडबँड ग्राहकांच्या जीवनात मोठा बदल होणार आहे. मोदी सरकार एप्रिल महिन्यापासून संपूर्ण देशात BSNL 4G नेटवर्क सेवा सुरू करण्याची घोषणा करणार आहे. 

आता हरियाणाचे सायबर सिटी गुरुग्राम असो वा वाराणसी, यूपीचे गाझीपूर किंवा बेगुसराय, बिहारचे समस्तीपूर यांसारखी छोटी शहरे असोत, तेही 4G सेवेचा लाभ घेण्यास सुरुवात करतील. राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेशसह संपूर्ण ईशान्येकडील राज्यांमध्ये राहणाऱ्या लोकांनाही 4G सेवा सुरू झाल्यानंतर अनेक सुविधा मिळतील.

मुकेश अंबानी यांच्या Reliance ची ऐतिहासिक कामगिरी; 'हा' रेकॉर्ड करणारी पहिली कंपनी...

बीएसएनएलची योजना राज्य सरकारांच्या मदतीने गावातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, पंचायत इमारती आणि सर्व सरकारी संस्थांमध्ये येत्या काही दिवसांत मोफत इंटरनेट सेवा सुरू करण्याची योजना आहे. याद्वारे ग्राहकांना त्याच जुन्या क्रमांकावर कॉल करण्यासोबतच इंटरनेटची सुविधाही मिळणार आहे. BSNL अजूनही देशाच्या काही भागात 4G सेवा पुरवत आहे, पण ही सुविधा संपूर्ण देशात एप्रिल महिन्यापासून लागू होणार आहे.

या दिवसापासून 4G सेवा सुरू होणार

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,देशातील गावांमध्ये इंटरनेट केबल कनेक्शन देण्यासाठी अधिकाऱ्यांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जात आहेत. यासाठी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणही देण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक पातळीवरही राज्य सरकारांना बीएसएनएल कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्यास सांगण्यात आले आहे. कनेक्शन जोडण्यासाठी बीएसएनएलचे अधिकारी गावातील प्रमुख आणि सरपंचांशी संपर्क साधत आहेत.

लवकरच देशातील ८० लाख गावांमधील प्रत्येक घरापर्यंत बीएसएनएल कनेक्शन पोहोचेल. मोठ्या पायाभूत सुविधा असूनही बीएसएनएल खासगी कंपन्यांशी स्पर्धा करू शकली नाही. मोदी सरकारने बीएसएनएलला २०१९ मध्ये ७०,००० कोटी रुपयांचे पुनरुज्जीवन पॅकेज दिले. २०२२ मध्ये देखील मोदी मंत्रिमंडळाने BSNL आणि MTNL च्या पुनरुज्जीवनासाठी १.६४ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी दिली.

Web Title: BSNL From this day, mobile, internet and broadband services will be provided cheaply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.