Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > विमान तिकीट बुक करा अन् २ हजारांपर्यंत सूट मिळवा

विमान तिकीट बुक करा अन् २ हजारांपर्यंत सूट मिळवा

‘आयआरसीटीसी’ची विशेष ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 06:07 IST2023-09-26T06:06:44+5:302023-09-26T06:07:14+5:30

‘आयआरसीटीसी’ची विशेष ऑफर

Book flight tickets and get discounts up to 2 thousand | विमान तिकीट बुक करा अन् २ हजारांपर्यंत सूट मिळवा

विमान तिकीट बुक करा अन् २ हजारांपर्यंत सूट मिळवा

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई :  इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने २४ व्या स्थापना दिन व जागतिक पर्यटन दिनानिमित्त विमान तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना २५ ते २७ सप्टेंबरदरम्यान अनेक ऑफर्स देऊ केल्या आहेत.  आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून विमान तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना २ हजारांपर्यंत सूट मिळणार आहे.

विमान तिकीट बुक करणाऱ्या ग्राहकांकडून आयआरसीटीसी कोणतेही सुविधा शुल्क आकारणार नाही. आयआरसीटीसीच्या एअर तिकीट पोर्टलद्वारे, तसेच मोबाइल ॲपद्वारे तिकीट बुक करता येणार आहे. तिकीट बुक करून या ऑफरचा लाभ घेऊ शकाल. शून्य सुविधा शुल्कासह, आयआरसीटीसीने विविध बँकांच्या कार्ड व्यवहारांवर हवाई तिकिटांवर दोन हजार रुपयांपर्यंत सूट देऊन इतर ऑफरदेखील सुरू केल्या आहेत. आयआरसीटीसीने निवेदनात म्हटले आहे की, मर्यादित कालावधीच्या सवलतीशिवाय  आयआरसीटीसी एअर, सरकारी अधिकाऱ्यांसाठी सवलत देण्यात येणार आहे. 

 

Web Title: Book flight tickets and get discounts up to 2 thousand