Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘बड वेव्हील’ पोखरतेय तुरीचे पीक

‘बड वेव्हील’ पोखरतेय तुरीचे पीक

शेतक-यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे तुरीचे पीक ‘बड वेव्हील’ नावाच्या किडींनी पोखरणे सुरू केले आहे. त्यामुळे शेतक-यांना उत्पन्नाची हमी देणारे पीकही हातचे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

By admin | Updated: October 21, 2014 05:02 IST2014-10-21T05:02:55+5:302014-10-21T05:02:55+5:30

शेतक-यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे तुरीचे पीक ‘बड वेव्हील’ नावाच्या किडींनी पोखरणे सुरू केले आहे. त्यामुळे शेतक-यांना उत्पन्नाची हमी देणारे पीकही हातचे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

The 'Big Vevill' is a tropical crop | ‘बड वेव्हील’ पोखरतेय तुरीचे पीक

‘बड वेव्हील’ पोखरतेय तुरीचे पीक

संतोष मुंढे, वाशिम
शेतक-यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे तुरीचे पीक ‘बड वेव्हील’ नावाच्या किडींनी पोखरणे सुरू केले आहे. त्यामुळे शेतक-यांना उत्पन्नाची हमी देणारे पीकही हातचे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
साधारणत: स्ट्रॉबेरीवर आढळणारी बड वेव्हील कीड यापूर्वी आंध्र प्रदेश आणि तामीळनाडूत तुरीच्या पिकावरही अल्पप्रमाणात आढळल्याची नोंद आहे. महाराष्ट्रातही या किडीने तुरीचे पीक पोखरण्याचे काम अनेक वर्षांपासून केले आहे. बड वेव्हीलचा धोका व त्याचे दुष्परिणाम वाशिम येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ आणि प्रभारी अधिकारी डॉ. भरत गीते यांच्या निदर्शनास आले असून, त्या पृष्ठभूमीवर यासंदर्भात कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.
साधारणत: या पिकाला पाच ते सहावेळा बहर येतो. त्यामुळे पहिला बहर गळून पडला, तरी दुसरा येईल, तोही गेला तर तिसरा, चौथा किंवा पाचवा बहर येईल, या आशेवर शेतकरी विसंबून असतात; परंतु पिकाची काळजी घेतल्यानंतरही फूलगळ किंवा कळी गळण्याचे प्रमाण रोखणे का शक्य होत नाही, हे आजवर कोडेच होते. शास्त्रज्ञ गीते यांनी शेतकऱ्यांच्या या समस्येवर शोध मोहीम हाती घेतली.
अतिसूक्ष्म रूपात तुरीच्या कळ््यात राहून त्या पोखरण्याचे काम ‘बड वेव्हील’ करीत असल्याचे डॉ. गीतेंना या शोध मोहिमेतून लक्षात आले. साधारणत: स्ट्रॉबेरीवर आक्रमण करणारी प्रमुख कीड म्हणून बड वेव्हीलकडे पाहिले जाते. ही कीड तुरीच्या कळ्या आतून पोखरण्याचे काम करते. त्यामुळे कळ्या गळून पडतात. कळ्या व फुलगळीमागचे हे कारण स्पष्ट झाल्यानंतर, हा धोका तुरीचे पीक संपविण्यासाठी किती प्रमाणात कारणीभूत आहे, याची पाहणी करण्यात आली.
दहापैकी सहा ते सात कळ््या संपविण्याचे काम बड वेव्हीलने केल्याची धक्कादायक बाब या पाहणीतून समोर आली. त्यामुळे पिकाची चांगली देखभाल करूनही उत्पादन एकरी तीन ते चार पोत्याच्या पुढे सरकत नसल्याची बाब समोर आली आहे. सोयाबीनवर आलेला पिवळा मोझॅक आणि आता तुरीवर झालेल्या बड वेव्हीलच्या आक्रमणाने नगदी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.

Web Title: The 'Big Vevill' is a tropical crop