Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > HDFC बँकेला मोठा झटका! चेअरमन अतनु चक्रवर्ती यांचा अचानक राजीनामा; बँकिंग जगतात खळबळ

HDFC बँकेला मोठा झटका! चेअरमन अतनु चक्रवर्ती यांचा अचानक राजीनामा; बँकिंग जगतात खळबळ

HDFC Bank Chairman Resigns: देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या एचडीएफसी बँकेत मोठी खळबळ उडाली आहे. पाहा काय म्हटलंय त्यांनी आपल्या राजीनाम्यात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 10:13 IST2026-03-19T10:12:11+5:302026-03-19T10:13:25+5:30

HDFC Bank Chairman Resigns: देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या एचडीएफसी बँकेत मोठी खळबळ उडाली आहे. पाहा काय म्हटलंय त्यांनी आपल्या राजीनाम्यात.

Big blow to HDFC Bank Chairman Atanu Chakrabortys sudden resignation big blow in the banking world | HDFC बँकेला मोठा झटका! चेअरमन अतनु चक्रवर्ती यांचा अचानक राजीनामा; बँकिंग जगतात खळबळ

HDFC बँकेला मोठा झटका! चेअरमन अतनु चक्रवर्ती यांचा अचानक राजीनामा; बँकिंग जगतात खळबळ

HDFC Bank Chairman Resigns: देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या एचडीएफसी (HDFC) बँकेत मोठी खळबळ उडाली आहे. बँकेचे पार्ट टाईम अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक अतनु चक्रवर्ती यांनी आपल्या पदाचा तातडीनं राजीनामा दिलाय. १८ मार्च रोजी दिलेल्या या राजीनाम्यामुळे बँकिंग क्षेत्रात अनेक प्रश्न उपस्थित झालेत, विशेषतः त्यांनी आपल्या या निर्णयामागे 'नैतिक कारणांचा' उल्लेख केल्याने चर्चांना उधाण आलंय.

अतनु चक्रवर्ती यांनी आपल्या राजीनामा पत्रात स्पष्टपणे नमूद केलंय की, गेल्या दोन वर्षांत बँकेच्या अंतर्गत काही अशा घडामोडी आणि कामकाजाच्या पद्धती पाहायला मिळाल्या, ज्या त्यांच्या वैयक्तिक मूल्यांशी आणि नैतिकतेशी सुसंगत नव्हत्या. याच कारणामुळे त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या राजीनाम्यामागे इतर कोणतंही मोठं कारण नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात जोरदार आपटला, सेन्सेक्स १६०० अंकांनी कोसळला; HDFC मध्ये मोठी घसरण

नवीन हंगामी अध्यक्षांची नियुक्ती

चक्रवर्ती यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) एचडीएफसी बँकेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून केकी मिस्त्री यांची १९ मार्चपासून पुढील तीन महिन्यांसाठी हंगामी पार्ट टाईम चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संक्रमण काळात बँकेच्या कामकाजात स्थिरता राखण्याची महत्त्वाची जबाबदारी आता त्यांच्यावर असेल.

विलीनीकरणाच्या काळात बजावलेली महत्त्वाची भूमिका

अतनु चक्रवर्ती यांनी २०२१ मध्ये बँकेच्या बोर्डात प्रवेश केला होता. त्यांच्या कार्यकाळात एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड यांच्यातील ऐतिहासिक विलीनीकरण पार पडलं, ज्यामुळे ही बँक देशातील दुसरी सर्वात मोठी बँक बनली. मात्र, या विलीनीकरणाचे पूर्ण फायदे अद्याप समोर येणं बाकी असल्याचंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

बाजारपेठेवर झालेला परिणाम

या राजीनाम्याचे पडसाद शेअर बाजारातही उमटले आहेत. अमेरिकन बाजारपेठेत एचडीएफसी बँकेच्या 'अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट्स' (ADRs) मध्ये सुमारे ३ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. अध्यक्षांना असं पाऊल का उचलावं लागलं, याबाबत आता गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.

बँकेची आर्थिक स्थिती अजूनही भक्कम

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बँकेची आर्थिक कामगिरी मात्र मजबूत राहिली आहे. आर्थिक वर्ष २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत बँकेचा नफा ११.५ टक्क्यांनी वाढून १८,६५४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर, निव्वळ व्याज उत्पन्नात झालेली चांगली वाढ बँकेची भक्कम पायाभूत स्थिती दर्शवते.

Web Title : एचडीएफसी बैंक के चेयरमैन का अचानक इस्तीफा, नैतिक कारणों का हवाला; बैंकिंग जगत में खलबली

Web Summary : एचडीएफसी बैंक के चेयरमैन अतनु चक्रवर्ती ने नैतिक कारणों का हवाला देते हुए इस्तीफा दे दिया। आरबीआई ने केकी मिस्त्री को अंतरिम चेयरमैन नियुक्त किया। इस्तीफे से एचडीएफसी के एडीआर पर असर पड़ा, लेकिन बैंक का वित्तीय प्रदर्शन मजबूत बना हुआ है।

Web Title : HDFC Bank Chairman Resigns Abruptly, Citing Ethical Concerns; Shocks Banking Sector

Web Summary : HDFC Bank's chairman, Atanu Chakraborty, resigned citing ethical concerns over internal practices. RBI appointed Keki Mistry as interim chairman. The resignation impacted HDFC's ADRs, but the bank's financial performance remains strong.