मर्सिडीज कार ही आवडत नाही किंवा ही कार आपल्याकडे असावी असे स्वप्न पाहत नाही, असं क्वचितच कुणी असावं. तर या मर्सिडीजचे चेअरमन डीटर हे लवकरच निवृत्त होणार आहेत. त्यानंतर त्यांना पेन्शन मिळेल. त्यांची ही पेन्शनच सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. कारण या पेन्शची रक्कम वाचून तुम्ही कपाळावर हात मारून घ्याला.
किती मिळणार आहे पेन्शन?
डीटर सेटे यांना निवृत्तीनंतर १०.५ लाख यूरो इतकं पेन्शन मिळणार आहे. भारतीय मुद्रेत ही रक्कम ८,५४,२३,८३४.०९ इतकी होते. खरंतर या पेन्शनबाबतचा निर्णय २०१७ मध्येच झाला होता. त्यासोबतच त्यांना पेन्शन फंडमध्ये दरवर्षी ५ लाख यूरो मिळण्याचीही शक्यता आहे.
रेकॉर्डतोड पेन्शन
जर्मनीतील प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की सेचे जर्मन कंपन्यांच्या इतिहासात सर्वात जास्त पेन्शन घेणारे व्यक्ती ठरणार आहेत. त्यांना दिवसाला ४,२५० यूरो म्हणजेच ३.४४ लाख रूपये पेन्शन मिळणार आहे.
(Image Credit : Fortune)
निवृत्तीनंतर कमाईची इतर दारे उघड
सेचे यांच्याकडे पैसे कमावण्याचे आणखी काही पर्याय उघड झाले आहेत. ते २००६ पासून मर्सिडीज बेंझचे मुख्य आहेत. मर्सिडीज कारची निर्मिती करणारी डायलमर कंपनी त्यांनी १९७६ मध्ये जॉइन केली होती. २०२१ मध्ये डायलमर कंपनीच्या बोर्डमध्येही असण्याची शक्यता आहे. असे झाले तर त्यांची कमाई आणखीन वाढणार आहे.