Lokmat Money > बिझनेस न्यूज > भाविश अग्रवालनी गुंतवणुकदारांना सांगायचे सोडून, जगाला सांगून टाकले; सेबीला खटकले, OLA चे शेअर्स कोसळले

भाविश अग्रवालनी गुंतवणुकदारांना सांगायचे सोडून, जगाला सांगून टाकले; सेबीला खटकले, OLA चे शेअर्स कोसळले

Ola Electric news: ओला इलेक्ट्रीक पुन्हा एकदा नियामकाच्या रडारवर आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे विस्तार तपशील (विस्तार योजना) उघड करून प्रकटीकरण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सेबीने ओलाला नोटीस पाठविली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 14:44 IST2025-01-08T14:44:32+5:302025-01-08T14:44:49+5:30

Ola Electric news: ओला इलेक्ट्रीक पुन्हा एकदा नियामकाच्या रडारवर आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे विस्तार तपशील (विस्तार योजना) उघड करून प्रकटीकरण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सेबीने ओलाला नोटीस पाठविली आहे.

Bhavish Agarwal failed to tell investors and told the world; SEBI was angry, OLA shares crashed | भाविश अग्रवालनी गुंतवणुकदारांना सांगायचे सोडून, जगाला सांगून टाकले; सेबीला खटकले, OLA चे शेअर्स कोसळले

भाविश अग्रवालनी गुंतवणुकदारांना सांगायचे सोडून, जगाला सांगून टाकले; सेबीला खटकले, OLA चे शेअर्स कोसळले

ओला ईलेक्ट्रीकवर एकामागोमाग एक संकटे कोसळू लागली आहेत. गाजावाजा करत सुरु केलेल्या कंपनीचा आलेख तेवढाच गाजावाजा करत खाली खाली जाऊ लागला आहे. ओला स्कूटरमधील समस्या आणि वैतागलेल्या ग्राहकांमुळे ओलाला केंद्र सरकारच्या नोटीस आल्या होत्या. सर्व्हिस मिळत नसल्याने सर्व्हिस सेंटरबाहेर गाड्यांचा खच पडला होता. याचा फटका डिसेंबरमधील विक्रीला बसला आहेच पण आता सेबीचीही एन्ट्री झाली आहे. 

ओला इलेक्ट्रीक पुन्हा एकदा नियामकाच्या रडारवर आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे विस्तार तपशील (विस्तार योजना) उघड करून प्रकटीकरण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सेबीने ओलाला नोटीस पाठविली आहे. याचे वृत्त पसरताच शेअर बाजारात ओलाचे शेअर ५ टक्क्यांनी घसरले आहेत. 

ओला इलेक्ट्रिकने X सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे आपल्या विस्तार योजना जाहीर केल्या होत्या. 2024 च्या अखेरीस 4,000 शोरूमसह भारतात आपले नेटवर्क वाढविणार असल्याचे भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर जाहीर केले होते. कंपनीने 25 डिसेंबर रोजी एकाच दिवसात देशभरात 3,200 शोरूम उघडले आहेत. सेबीने यावर आक्षेप घेतला आहे. 

विस्तार योजना स्टॉक एक्स्चेंजसह प्रकटीकरण प्रकाशित न करता लागू करण्यात आली असल्याचे सेबीने म्हटले आहे. बीएसई आणि एनएसईला २ डिसेंबरला दुपारी याबाबत कळविण्यात आले तर अग्रवाल यांनी ट्विटरवर सकाळीच ही गोष्ट जाहीर केली होती. यामुळे तुम्ही तुमच्या गुंतवणूकदारांना वेळेवर माहिती देण्यास असफल ठरला आहात, असे सेबीने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. भविष्यात अशाप्रकारच्या उल्लंघनापासून वाचण्याची, तंबीही सेबीने दिली आहे. 

Web Title: Bhavish Agarwal failed to tell investors and told the world; SEBI was angry, OLA shares crashed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.