Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्रदीप कोकाटेजवळ आढळले सहा सीमकार्ड भाटिया हत्या प्रकरण: कंपनीकडे मागविली माहिती

प्रदीप कोकाटेजवळ आढळले सहा सीमकार्ड भाटिया हत्या प्रकरण: कंपनीकडे मागविली माहिती

अहमदनगर : व्यापारी जितेंद्र भाटिया हत्याकांड प्रकरणातील आरोपी प्रदीप कोकाटे याच्याकडे आणखी सहा मोबाईल सीमकार्ड असल्याचे गुरुवारी पोलीस तपासात आढळून आले़ याविषयी कंपनीकडे माहिती मागविली आहे़ तसेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार जितेंद्र भाटिया यांची पत्नी दिव्यासह आरोपीला पिस्तूल पुरवणार्‍या गोट्या बेरडला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे़

By admin | Updated: May 8, 2014 21:08 IST2014-05-08T21:08:12+5:302014-05-08T21:08:12+5:30

अहमदनगर : व्यापारी जितेंद्र भाटिया हत्याकांड प्रकरणातील आरोपी प्रदीप कोकाटे याच्याकडे आणखी सहा मोबाईल सीमकार्ड असल्याचे गुरुवारी पोलीस तपासात आढळून आले़ याविषयी कंपनीकडे माहिती मागविली आहे़ तसेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार जितेंद्र भाटिया यांची पत्नी दिव्यासह आरोपीला पिस्तूल पुरवणार्‍या गोट्या बेरडला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे़

Bhatia murder case: Pradeep Kokate arrested for six SIM card Bhatia murder case: | प्रदीप कोकाटेजवळ आढळले सहा सीमकार्ड भाटिया हत्या प्रकरण: कंपनीकडे मागविली माहिती

प्रदीप कोकाटेजवळ आढळले सहा सीमकार्ड भाटिया हत्या प्रकरण: कंपनीकडे मागविली माहिती

मदनगर : व्यापारी जितेंद्र भाटिया हत्याकांड प्रकरणातील आरोपी प्रदीप कोकाटे याच्याकडे आणखी सहा मोबाईल सीमकार्ड असल्याचे गुरुवारी पोलीस तपासात आढळून आले़ याविषयी कंपनीकडे माहिती मागविली आहे़ तसेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार जितेंद्र भाटिया यांची पत्नी दिव्यासह आरोपीला पिस्तूल पुरवणार्‍या गोट्या बेरडला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे़
भाटिया यांची हत्या प्रेमसंबंधातून केल्याची कबुली प्रदीप कोकाटे व दिव्याने दिली आहे़ दिव्याने प्रेमसंबंधातून खून केल्याची स्पष्ट कबूली पोलिसांना दिली आहे़ प्रदीपच्या पोलीस कोठडीत १२ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे़ आरोपीकडे आणखी बरेच सीमकार्ड असल्याचा पोलिसांचा संशय खरा ठरला़ आरोपीकडे विविध कंपनीचे आणखी सहा सीमकार्ड असल्याचे तपासात गुरुवारी उघड झाले़ हे सीमकार्ड आरोपीने रस्त्यावरील कंपनीच्या स्टॉलवरून खेरदी केल्याचे उघड झाले आहे़ परंतु कंपनीने एकाच वेळी एवढे सीमकार्ड कशाच्या अधारे दिले, याची माहिती संबंधित कंपनीकडे करण्यात आली आहे़ तसे पत्र कंपनीला देण्यात आल्याचे तपासी अधिकार्‍यांनी दिली़ सीमकार्डच्या तपासातून या प्रकरणातील आणखी काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
दिव्याला आज न्यायालयात हजर करणार
दिव्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने तिला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे़ दिव्याकडून आणखी काही माहिती उपलब्ध झाली नाही़ मात्र प्रदीपने दिव्याला दिलेले सिमकार्ड पोलिसांच्या हाती लागले नाही़ हे सिमकार्ड शोधण्याची पोलिसांची मोहीम सुरू आहे़
़़़़
दिव्याचा भाऊ हेमंतला क्लीनचिट
दिव्याचा भाऊ हेमंत सचदेव यालाही चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते़ प्रदीपने हेमंतशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता़ परंतु हेमंतचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे उघड झाले़ त्यामुळे हेमंत सचदेव याला पोलिसांनी क्लीनचिट दिली़

Web Title: Bhatia murder case: Pradeep Kokate arrested for six SIM card Bhatia murder case: