Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोविड लस बनवणारी भारत बायोटेक करणार ४००० कोटींची गुंतवणूक, पाहा फार्मा कंपनीचा प्लॅन

कोविड लस बनवणारी भारत बायोटेक करणार ४००० कोटींची गुंतवणूक, पाहा फार्मा कंपनीचा प्लॅन

कोरोना महासाथीच्या काळात भारत बायोटेकनं आपल्या मेडिसिन फॅसिलिटीमध्ये ६००-७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 01:50 PM2023-09-26T13:50:31+5:302023-09-26T13:52:33+5:30

कोरोना महासाथीच्या काळात भारत बायोटेकनं आपल्या मेडिसिन फॅसिलिटीमध्ये ६००-७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

Bharat Biotech maker of Covid vaccine will invest 4000 crores see the plan of the pharma company | कोविड लस बनवणारी भारत बायोटेक करणार ४००० कोटींची गुंतवणूक, पाहा फार्मा कंपनीचा प्लॅन

कोविड लस बनवणारी भारत बायोटेक करणार ४००० कोटींची गुंतवणूक, पाहा फार्मा कंपनीचा प्लॅन

कोरोना महासाथीच्या काळात भारत बायोटेकनं आपल्या मेडिसिन फॅसिलिटीमध्ये ६००-७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. कंपनीनं कोव्हॅक्सिन आणि अन्य लसी तयार करून कोरोनाचा सामना करण्यासाठी देशाची मोठी मदत केली होती. ही लस अन्य देशांनाही विकण्यात आली होती. भारत बायोटेकनं या लसीच्या विक्रीतून मिळालेले पैसे त्यांनी पुन्हा गुंतवणार आहे. भारत बायोटेक लस, क्लिनिकल चाचण्या, उत्पादन प्रकल्प, भागीदारी इत्यादींवर ३००० ते ४००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. 

आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकन देशात भारत बायोटेकनं कोरोनाच्या लसींचा पुरवठा केला होता. आता ही फॅसिलिटी कंपनीसाठी मोठं आव्हान बनलं आहे. दरम्यान, कोरोना काळात वाढवलेल्या फॅसिलिटीच्या उपयोगाबाबत गंभीर विचार करणं भारत बायोटेकसाठी महत्त्वाचं आहे.

नवीन योजना
भारत बायोटेकची योजना नवीन लस आणण्यासाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये मोठा गुंतवणूक करण्याची आहे. कंपनी टीबीच्या लसीसह या योजनेवर विचार करू शकते, जी क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. भारत बायोटेक कंपनी परवाना मिळण्याच्या टप्प्यात असलेल्या नवीन कॉलरा लसीसाठी देखील आपली सुविधा वापरू शकते.

भारत बायोटेकनं भुवनेश्वरमध्ये १२०० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीतून एक नवा प्रकल्प सुरू करण्याची योजना तयार केली आहे. ना केवळ कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी यामुळे मदत मिळेल, तर दुसऱ्या औषध कंपन्यांच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठीही मदत मिळण्याची अपेक्षा आहे. भारत बायोटेकनं आपल्या थेरेप्युटिक व्यवसायाला वेगळं केलं आहे. या व्यवसायाचा वार्षिक टर्नओव्हर २०-२५ कोटी रुपये आहे.

Web Title: Bharat Biotech maker of Covid vaccine will invest 4000 crores see the plan of the pharma company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.