Lokmat Money > बिझनेस न्यूज > सावधान...! १७ रुपयांपर्यंत घसरू शकतो या बँकेचा शेअर, २-२ तज्ज्ञांनी दिलाय विक्रीचा सल्ला; जाणून घ्या

सावधान...! १७ रुपयांपर्यंत घसरू शकतो या बँकेचा शेअर, २-२ तज्ज्ञांनी दिलाय विक्रीचा सल्ला; जाणून घ्या

काय म्हणतायत इतर ब्रोकरेज? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 17:29 IST2025-07-22T17:28:13+5:302025-07-22T17:29:11+5:30

काय म्हणतायत इतर ब्रोकरेज? जाणून घ्या...

Beware This bank's stock may fall to Rs 17 experts have advised selling Know | सावधान...! १७ रुपयांपर्यंत घसरू शकतो या बँकेचा शेअर, २-२ तज्ज्ञांनी दिलाय विक्रीचा सल्ला; जाणून घ्या

सावधान...! १७ रुपयांपर्यंत घसरू शकतो या बँकेचा शेअर, २-२ तज्ज्ञांनी दिलाय विक्रीचा सल्ला; जाणून घ्या

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने पहिल्या तिमाहीच्या निकालांनंतर येस बँकेच्या शेअर्सचे रेटिंग वाढवले आहे. आपल्या ताज्या अहवालात, देशांतर्गत ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की करपश्चात नफ्यात (पीएटी) हळूहळू सुधारणा होत आहे. त्यांनी स्टॉकचे रेटिंग 'रिड्यूस' वरून 'होल्ड' केले आहे आणि टार्गेट प्राइसमध्ये सुधारणा केली आहे. तसेच, एमके ग्लोबलने टार्गेट प्राइस १७ रुपये केली असून विक्रीचा सल्ला दिला आहे. आज कंपनीचा शेअर किंचितशा घसरणीनंतर, २०.०२ रुपयांवर ट्रेड करत आह.

असे आहेत डिटेल्स -
आयसीआयसीआय सिक्युरिटीजने एका नोटमध्ये म्हटले आहे, निव्वळ एनपीए तिमाही-दर-तिमाही ०.३ टक्क्यांवर स्थिर राहिला, तर पीसीआर ८० टक्क्यांवर राहिला. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने या स्टॉकवर 'होल्ड' रेटिंग दिले आहे आणि २० रुपये (पूर्वी १६ रुपये) टार्गेट प्राइस निश्चित केली आहे.

काय म्हणतायत इतर ब्रोकरेज? -
एमके ग्लोबलने टार्गेट प्राइस १६ रुपयांवरून १७ रुपये केली आहे. मात्र, कमकुवत वृद्धी/परतावा गुणोत्तर आणि उच्च मूल्यांकन पाहता, 'विक्री' रेटिंग कायम ठेवली आहे. 
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने म्हटले आहे की, "आम्ही १८ रुपये (पूर्वी १७ रुपये) च्या वाजवी मूल्यासह 'विक्री' रेटिंग कायम ठेवतो. कारण मूल्यांकन अद्यापही महगा आहे."

जून तिमाहीचा निकाल -
येस बँकेने शनिवारी जून 2025 च्या तिमाहीत आपल्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर (YoY) 59 टक्क्यांची वृद्धी दर्शवली. जी गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील 502 कोटी रुपयांच्या तुलनेत, 801 कोटी रुपये झाली आहे.  

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Beware This bank's stock may fall to Rs 17 experts have advised selling Know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.