Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > लग्नसराईच्या मागणीचा सोन्याला लाभ

लग्नसराईच्या मागणीचा सोन्याला लाभ

जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या भावात लग्नसराईची मागणी वाढली.

By admin | Updated: May 7, 2014 04:00 IST2014-05-06T17:51:14+5:302014-05-07T04:00:53+5:30

जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या भावात लग्नसराईची मागणी वाढली.

The benefits of gold demand for marriage | लग्नसराईच्या मागणीचा सोन्याला लाभ

लग्नसराईच्या मागणीचा सोन्याला लाभ

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या भावात लग्नसराईची मागणी वाढली. परिणामी सोन्याचा भाव २० रुपयांच्या तेजीसह ३०,७०० रुपये प्रतितोळा झाला. दुसरीकडे चांदीचा भाव सलग दुसर्‍या दिवशी ४२,४०० रुपये प्रतिकिलोवर कायम राहिला.
बाजारातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांकडून लग्नसराईच्या मागणीत वाढ नोंदली गेली. स्टॉकिस्ट आणि किरकोळ ग्राहकांकडून चांगली मागणी आल्याने ही वाढ झाली. सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव ०.२ टक्के तेजीसह १३१२.३७ डॉलर प्रतिऔंस राहिला.
दिल्ली बाजारात ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी २० रुपयांनी वाढून अनुक्रमे ३०,७०० रुपये आणि ३०,५०० रुपये प्रतितोळा झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २५,१५० रुपयांवर कायम राहिला.
तयार चांदीचा भाव ४२,७०० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. दुसरीकडे सट्टेबाजांकडून मागणी मिळाल्याने चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ५१९ रुपयांनी वाढून ४२,६०० रुपये प्रतिकिलो झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: The benefits of gold demand for marriage