गुरुदयालसिंग संधू यांनी पुढे असेही सांगितले की, फसवेगिरी वा मुद्दाम कर्जफेड चुकविणार्याविरोधात बँकांनी आधी पावले उचलली पाहिजेत. त्यासाठी जबाबदार लोकांविरोधात कायदेशीर कारवाई केली पाहिजे. अनेक बँकात फसवेगिरीच्या घटना आढळल्या आहेत, बँकेला फसविण्याच्या दृष्टीने कर्जफेड न करणे किंवा मुद्दाम कर्जफेड रोखणे ही दोन्हीही प्रकरणे एकाच प्रकारची आहेत. कर्जफेड करण्याची इच्छाच नाही ही प्रवृत्ती असून, त्याविरोधात कडक कारवाई झाली पाहिजे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या थकित कर्जांचे म्हणजेच एनपीएचे प्रमाण मार्च २०१३ मध्ये २८.५ टक्के वाढले असून, हा आकडा २०१२ च्या तुलनेत १.८३ लाख कोटी रुपयांवरून २.३६ लाख कोटी रुपयांवर गेला आहे.
बँका सुधारणा जोड
फसवेगिरी वा मुद्दाम कर्जफेड चुकविणार्याविरोधात बँकांनी आधी पावले उचलली पाहिजेत.
By admin | Updated: May 5, 2014 14:25 IST2014-05-04T23:54:10+5:302014-05-05T14:25:04+5:30
फसवेगिरी वा मुद्दाम कर्जफेड चुकविणार्याविरोधात बँकांनी आधी पावले उचलली पाहिजेत.
