Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Bank Loan Rejection Reasons: पगार भक्कम असूनही बँक कर्ज नाकारतेय? 'या' ४ चुका ठरू शकतात कारणीभूत!

Bank Loan Rejection Reasons: पगार भक्कम असूनही बँक कर्ज नाकारतेय? 'या' ४ चुका ठरू शकतात कारणीभूत!

अनेकांना असं वाटतं की मोठा पगार असेल तर कोणतंही बँक कर्ज सहज मिळेल. पण प्रत्यक्षात बँक तुमचा पगार नाही, तर तुमची आर्थिक शिस्त तपासते. 'सिबिल स्कोअर'पासून ते तुमच्या नोकरी बदलण्याच्या सवयीपर्यंत अनेक गोष्टींचा कर्जावर परिणाम होतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 14:57 IST2026-04-20T14:56:29+5:302026-04-20T14:57:50+5:30

अनेकांना असं वाटतं की मोठा पगार असेल तर कोणतंही बँक कर्ज सहज मिळेल. पण प्रत्यक्षात बँक तुमचा पगार नाही, तर तुमची आर्थिक शिस्त तपासते. 'सिबिल स्कोअर'पासून ते तुमच्या नोकरी बदलण्याच्या सवयीपर्यंत अनेक गोष्टींचा कर्जावर परिणाम होतो.

Bank Loan Rejection Reasons: Is the bank rejecting a loan despite a strong salary? These 4 mistakes could be the reason! | Bank Loan Rejection Reasons: पगार भक्कम असूनही बँक कर्ज नाकारतेय? 'या' ४ चुका ठरू शकतात कारणीभूत!

Bank Loan Rejection Reasons: पगार भक्कम असूनही बँक कर्ज नाकारतेय? 'या' ४ चुका ठरू शकतात कारणीभूत!

तुमचा पगार चांगला आहे, नोकरी कायमस्वरूपी आहे आणि दरमहा खात्यात मोठी रक्कम जमा होतेय. अशा स्थितीत आपण गृहकर्ज किंवा वैयक्तिक कर्जासाठी पात्र आहोत, असा विश्वास वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, अनेकदा पगार भक्कम असूनही बँका कर्ज अर्ज फेटाळून लावतात. असे का होते? कारण, बँक तुमचा पगार नाही, तर तुमच्या खर्चाची पद्धत आणि 'सिबिल' स्कोअर तपासत असते. याबाबत आपण आज जाणून घेऊ या...

हातात उरणारी रक्कम महत्त्वाची  का असते?

बँक तुमचा एकूण पगार किती आहे, यापेक्षा सर्व खर्च वजा जाता तुमच्या हातात किती पैसे उरतात, हे पाहते. तुमचे आधीच सुरू असलेले गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, विम्याचे हप्ते यात जर पगाराचा मोठा हिस्सा जात असेल, तर नवीन कर्जाचा हप्ता भरण्याची तुमची क्षमता कमी आहे, असे बँक मानते.

क्रेडिट कार्डचा अतिवापर

तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरत आहात. मात्र, तुम्ही दरमहा तुमच्या मर्यादेच्या (लिमिट) ८०-९० टक्के वापर करीत असाल, तर तुम्ही 'क्रेडिट हंग्री' आहात, असा संदेश जातो. कर्जावर जास्त अवलंबून आहात, असे बँकेला वाटल्यास अर्ज नाकारला जातो. हप्ता चुकला असेल तरी फटका बसतो.

वारंवार नोकरी बदलणे

तुमचा पगार वाढत असला तरी, तुम्ही वारंवार नोकऱ्या बदलत असाल, तर बँक तुम्हाला 'अनस्टेबल' मानते. कर्जाचे हप्ते दीर्घकाळ चालणारे असतात, त्यामुळे उत्पन्नात सातत्य असणे महत्त्वाचे असते. तुम्ही 'जामीनदार' असाल आणि त्या व्यक्तीने हप्ते थकवले असतील, तरी फटका बसतो.

एकाच वेळी अनेक ठिकाणी कर्जासाठी अर्ज करणे

कर्ज नाकारले गेल्यावर लगेच दुसऱ्या बँकेत अर्ज करण्याची चूक करू नका. तुम्ही जितक्या वेळा कर्जासाठी चौकशी करता, तितक्या वेळा तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर त्याची नोंद होते. एकाच वेळी अनेक बँकांकडे धाव घेतल्यास तुम्ही आर्थिक संकटात आहात, असा समज होतो.

Web Title : अच्छी सैलरी के बावजूद बैंक लोन क्यों खारिज? ये हो सकते हैं कारण!

Web Summary : अच्छी सैलरी होने पर भी बैंक लोन खारिज कर देते हैं क्योंकि वे खर्च करने की आदतें, सिबिल स्कोर, क्रेडिट कार्ड का अधिक उपयोग, बार-बार नौकरी बदलना और कई लोन आवेदन देखते हैं। बैंक डिस्पोजेबल आय और स्थिरता को प्राथमिकता देते हैं।

Web Title : Bank loan rejected despite good salary? These reasons may be the cause!

Web Summary : Even with a good salary, banks reject loan applications due to spending habits, CIBIL score, high credit card usage, frequent job changes, and multiple loan applications. Banks prioritize disposable income and stability.

टॅग्स :bankबँक