Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > चलनवाढ कमी करण्यास प्रयत्नशील

चलनवाढ कमी करण्यास प्रयत्नशील

भारतीय रिझर्व्ह बॅँकेच्या आगामी पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी नवीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली

By admin | Updated: May 28, 2014 03:40 IST2014-05-28T03:40:49+5:302014-05-28T03:40:49+5:30

भारतीय रिझर्व्ह बॅँकेच्या आगामी पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी नवीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली

Attempt to reduce inflation | चलनवाढ कमी करण्यास प्रयत्नशील

चलनवाढ कमी करण्यास प्रयत्नशील

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बॅँकेच्या आगामी पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी नवीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. चलनवाढ कमी करण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बॅँकेतर्फे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अरुण जेटली यांनी केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच राजन यांनी त्यांची भेट घेतली. सुमारे ५० मिनिटे या दोघांत चर्चा झाली. घटता विकासदर आणि वाढती चलनवाढ यामध्ये समतोल साधण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे अर्थमंत्री जेटली यांनी स्पष्ट केले. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना राजन यांनी सांगितले की,चलनवाढीला आळा घालणे ही रिझर्व्ह बॅँक आणि अर्थखाते यांची प्राथमिकता आहे. आर्थिक वाढ आणि चलनवाढ यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बॅँकेने कायमच केला आहे. यापुढेही हे प्रयत्न सुरूच राहतील. चलनवाढीचा दर वाढता असल्यामुळे रिझर्व्ह बॅँकेला व्याजदरासह सर्व दर अधिक ठेवावे लागत असल्याचे राजन यांनी स्पष्ट केले. रिझर्व्ह बॅँक येत्या ३ जून रोजी पतधोरणाचा आढावा घेणार आहे. सोन्याच्या आयातीवरील निर्बंध मागे घेण्याबाबत राजन यांना विचारले असता त्यांनी धोरण जाहीर होईपर्यंत वाट बघण्याचा सल्ला पत्रकारांना दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Attempt to reduce inflation