Lokmat Money > बिझनेस न्यूज > बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव

बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव

Ashok Leyland Q1 Results:पाहा कोणती आहे ही कंपनी, तुमच्याकडे आहेत का शेअर्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 15:04 IST2025-08-14T15:02:05+5:302025-08-14T15:04:22+5:30

Ashok Leyland Q1 Results:पाहा कोणती आहे ही कंपनी, तुमच्याकडे आहेत का शेअर्स?

Ashok Leyland Q1 Results Bus manufacturing company posts profit of rs 594 crore Shares jump price hits rs 121 | बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव

बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव

Ashok Leyland Q1 Results: हिंदुजा समुहाची भारतीय प्रमुख कंपनी असलेल्या बस निर्माता अशोक लेलँडनं गुरुवारी, १४ ऑगस्ट रोजी जून तिमाहीचे निकाल जाहीर केले. जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर १३.४% वाढून ५९४ कोटी रुपये झाला, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ५२५ कोटी रुपये होता.

हा आकडा विश्लेषकांच्या अंदाजापेक्षाही जास्त आहे. कंपनीनं पहिल्या तिमाहीत ८,७२५ कोटी रुपयांचा सर्वाधिक महसूल नोंदवला, जो आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत ८,५९८ कोटी रुपयांपेक्षा १.५% जास्त आहे. तसंच, पहिल्या तिमाहीत व्यावसायिक वाहनांची विक्रीही विक्रमी ४४,२३८ युनिट्स इतकी नोंदवली गेली. आज कंपनीचे शेअर्स २ टक्क्यांनी वाढून १२१.४५ रुपये झालेत.

रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली

काय आहे अधिक माहिती?

ऑपरेटिंग पातळीवर, EBITDA ₹९७० कोटी होता, जो आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीतील ₹९११ कोटींवरून ६.५% जास्त आहे. खर्च नियंत्रणाच्या उपायांमुळे मार्जिन ५० बेसिस पॉइंट्सनं वाढून १०.६% वरून ११% झालं आहे. "देशांतर्गत MHCV उद्योग विक्री गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीतील उच्च आधारावर जवळजवळ स्थिर राहिली. अशोक लेलँडच्या MHCV ट्रक विक्रीत (संरक्षण वगळता) २% वाढ झाली, ज्यामुळे त्याचा बाजार हिस्सा २८.९% वरून ३०.७% झाला. MHCV बस TIV (इलेक्ट्रिक वाहने वगळता) ५% वाढ झाली. अशोक लेलँडनं MHCV बसेसमध्ये देशांतर्गत बाजारपेठेत आपलं आघाडीचं स्थान कायम ठेवलं आहे," असं कंपनीनं त्यांच्या अहवालात म्हटलंय.

कंपनीनं काय म्हटलं?

कंपनीनं पहिल्या तिमाहीतील सर्वाधिक १५,५६६ वाहनांची देशांतर्गत विक्री नोंदविली आहे. पहिल्या तिमाहीत निर्यातीचं प्रमाण २९ टक्क्यांनी वाढून ३,०११ युनिट झालंय. पॉवर सोल्युशन्स, आफ्टरमार्केट आणि डिफेन्स व्यवसायांनीही आर्थिक कामगिरीत महत्त्वपूर्ण योगदान दिलं. "अशोक लेलँडनं प्रभावी बाजार अंमलबजावणी आणि कठोर व्यवस्थापनाद्वारे अपेक्षेपेक्षा अधिक मजबूत तिमाही कामगिरी केली आहे," अशी प्रतिक्रिया अशोक लेलँडचे अध्यक्ष धीरज हिंदुजा यांनी दिली.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Ashok Leyland Q1 Results Bus manufacturing company posts profit of rs 594 crore Shares jump price hits rs 121

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.