Stock Market Investment: शेअर बाजारातगुंतवणूक करण्यासाठी एक नवीन साधन बाजारात आलं आहे. आपण स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड (Specialized Investment Fund) म्हणजेच SIF बद्दल बोलत आहोत. सेबीनं क्वांट म्युच्युअल फंडला (Quant Mutual Fund) एसआयएफ लाँच करण्यासाठी मान्यता दिली आहे. यासह, हा फंड लाँच करणारी ही पहिली भारतीय कंपनी असेल.
क्वांट म्युच्युअल फंडानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर यासंदर्भातील माहिती दिली. “कंपनीला SIF श्रेणीतील भारतातील पहिला शॉर्ट फंड लाँच करण्याची मान्यता मिळाली आहे,” असं कंपनीनं म्हटलंय. कंपनी ऑगस्टमध्ये म्हणजेच या महिन्यात हा फंड लाँच करू शकते. जरी SIF चा पर्याय बाजारात येत असला तरी, या नवीन गुंतवणूक साधनाचा SIP च्या लोकप्रियतेवर कोणताही परिणाम होण्याची शक्यता कमी असं म्हटलं जात आहे.
SIF म्हणजे काय?
आतापर्यंत, म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेसद्वारे (PMS) बाजारात गुंतवणूक करण्याची पद्धत बरीच लोकप्रिय होती. लहान गुंतवणूकदार म्युच्युअल फंडद्वारे गुंतवणूक करत होते, तर श्रीमंत लोक PMS द्वारे गुंतवणूक करत असत. परंतु या सर्वांमध्ये, काही गुंतवणूकदार असे होते ज्यांच्याकडे चांगले पैसे होते आणि त्यांची जोखीम घेण्याची क्षमता म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांपेक्षा थोडी जास्त होती. या गुंतवणूकदारांना लक्षात घेऊन, SEBI ने SIF सुरू केलं आहे. SIF मध्ये गुंतवणूक थोडी जास्त लक्ष केंद्रित करून केली जाते. परंतु त्यात जोखीम देखील जास्त असते.
SIF चे नियम काय आहेत?
जर एखाद्या व्यक्तीला SIF मध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्याला त्यात किमान १० लाख रुपये गुंतवावे लागतील. SIF ओपन-एंडेड, क्लोज-एंडेड आणि इंटरव्हल-एंडेडवर आधारित आहे. गुंतवणूकदारांना वेळेची मर्यादा स्वतः ठरवण्याचा पर्याय असेल. म्युच्युअल फंडांच्या तुलनेत येथे अधिक स्वातंत्र्य असेल. SIF अशा गुंतवणूकदारांसाठी तयार करण्यात आलंय आहे ज्यांना अधिक पर्याय हवे आहेत. यासोबतच, त्यांना त्यांच्या रकमेवर अधिक नियंत्रण आणि उत्तम संधी मिळतात.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)