Lokmat Money > बिझनेस न्यूज > डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा

डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा

Multibagger Defence Stock: संरक्षण क्षेत्रातील कंपनी अपोलो मायक्रो सिस्टम्सच्या शेअर्सनी गेल्या ६ महिन्यांत त्यांच्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:36 IST2025-09-09T13:33:49+5:302025-09-09T13:36:06+5:30

Multibagger Defence Stock: संरक्षण क्षेत्रातील कंपनी अपोलो मायक्रो सिस्टम्सच्या शेअर्सनी गेल्या ६ महिन्यांत त्यांच्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.

Apollo Micro Systems This Defense Stock Doubled Money in 6 Months | डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा

डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा

Multibagger Defence Stock :शेअर बाजारात मल्टीबॅगर शेअर्सची संख्या मोठी आहे. त्यातील अनेक शेअर्सनी कमी वेळेत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. असाच एक चमत्कार संरक्षण क्षेत्रातील अपोलो मायक्रो सिस्टम्स (Apollo Micro Systems) कंपनीच्या शेअरने केला आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची रक्कम अवघ्या सहा महिन्यांत दुप्पट झाली आहे, तर गेल्या पाच वर्षांत या शेअरने तब्बल २००० टक्क्यांहून अधिक परतावा देऊन गुंतवणूकदारांची चांगलीच कमाई करून दिली आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारीही या शेअरमध्ये तेजी दिसून आली.

शेअरच्या वेझीमुळे मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ
अपोलो मायक्रो सिस्टम्स ही इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रोमेकॅनिकल सिस्टीमचा पुरवठा करणारी कंपनी आहे. या कंपनीत आर्म्स सिस्टीम इलेक्ट्रॉनिक्स, पाणबुडीतील क्षेपणास्त्र, एव्हिओनिक सिस्टीम आणि पाणबुबी सिस्टीममध्ये वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांची डिझाइन, विकास आणि वितरण केले जाते. मंगळवारी हा शेअर २७५.२५ रुपयांवर उघडला आणि नंतर २९०.८० रुपयांपर्यंत पोहोचला. शेअरमधील या तेजीमुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्येही मोठी वाढ झाली आणि ते ९,२४० कोटी रुपयांवर पोहोचले.

६ महिन्यांतच केला चमत्कार
अपोलो मायक्रो सिस्टम्सच्या शेअरने फक्त सहा महिन्यांतच गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या कालावधीत गुंतवणूकदारांना १४०.२५ टक्क्यांचा जबरदस्त परतावा मिळाला आहे. १० मार्च रोजी या शेअरची किंमत ११६.९० रुपये होती, ती मंगळवारी २९०.८० रुपयांवर पोहोचली आहे.

५ वर्षांत बनला मल्टीबॅगर
हा डिफेन्स स्टॉक गेल्या ५ वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर म्हणून उदयास आला आहे. या काळात शेअरची किंमत ११ रुपयांवरून २९० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या ५ वर्षांत या शेअरने २,३२३.७८ टक्क्यांचा मोठा परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी अपोलो मायक्रो सिस्टम्सच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर त्याची रक्कम आता २४,२३,००० रुपये झाली असती.

वाचा - सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?

शेअर ३१५ रुपयांपर्यंत जाऊ शकतो!
सहा महिने आणि पाच वर्षांच्या परताव्याव्यतिरिक्त, या शेअरने एका वर्षात १७२ टक्क्यांचा परतावा दिला आहे. एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीजचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक शितिज गांधी यांच्या मते, अलीकडच्या काही आठवड्यांमध्ये या शेअरने चांगली कामगिरी केली असून, लवकरच तो ३१५ रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Apollo Micro Systems This Defense Stock Doubled Money in 6 Months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.