Multibagger Stock: मल्टीबॅगर कंपनी एपिस इंडिया आपल्या गुंतवणूकदारांना एक मोठं गिफ्ट देणार आहे. एफएमसीजी कंपनी एपिस इंडिया त्यांच्या शेअरहोल्डर्सना १:२४ च्या प्रमाणात बोनस शेअर्स वितरित करणार आहे. म्हणजेच, कंपनी प्रत्येक १ शेअरसाठी २४ मोफत शेअर्स वितरित करेल. एपिस इंडियानं बोनस शेअर्ससाठी रेकॉर्ड डेट शुक्रवार, ५ डिसेंबर २०२५ निश्चित केली आहे. कंपनी दुसऱ्यांदा त्यांच्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स भेट देत आहे. गेल्या काही वर्षांत एपिस इंडियाच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ५५०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
शेअर्समध्ये ५५९३% ची वाढ
मल्टी-बॅगर एपिस इंडियाच्या शेअर्समध्ये ५५९३% वाढ झाली आहे. १३ ऑक्टोबर २०२२ रोजी कंपनीचे शेअर्स २०.२५ वर होते. १ डिसेंबर २०२५ रोजी बीएसईवर एपिस इंडियाचे शेअर्स ११५२.७५ वर बंद झाले. गेल्या तीन वर्षांत कंपनीचे शेअर्स ४३७६% वाढले आहेत. गेल्या दोन वर्षांत, एपिस इंडियाचे शेअर्स १३०३% वाढलेत. या वर्षी ११ एप्रिलपासून कंपनीचे शेअर्स ३११% वाढले आहेत. एपिस इंडियाच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ₹११५२.७५ आहे, तर ५२ आठवड्यांचा नीचांक ₹२८०.४० आहे.
का होतेय भारतीय रुपयामध्ये घसरण? आशियातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या चलनांमध्ये सामिल
यापूर्वीही दिलेत बोनस शेअर्सचे
मल्टी-बॅगर एपिस इंडियानं यापूर्वी त्यांच्या शेअरहोल्डर्सना बोनस शेअर्स भेट म्हणून दिले आहेत. डिसेंबर २०१० मध्ये, कंपनीने त्यांच्या गुंतवणूकदारांना १००:३२३ च्या प्रमाणात बोनस शेअर्स वाटले. म्हणजेच, कंपनीने प्रत्येक १०० शेअर्ससाठी ३२३ बोनस शेअर्स दिले. प्रमोटर्सकडे कंपनीत ७४.७२% हिस्सा आहे, तर सार्वजनिक शेअरहोल्डिंग २५.२८% आहे. एपिस इंडियाचे मार्केट कॅप ₹६३५ कोटींपेक्षा जास्त झालं आहे. एपिस इंडिया मध (ऑर्गेनिक हनी, हिमालय हनी, रेग्युलर हनी आणि इन्फ्युज्ड हनी), खजूर, फळांचे जाम, सेरेल्स सोया चंक्स, आले लसूण पेस्ट आणि इतर अनेक उत्पादनं विकते.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञाचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
