Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अनिल अंबानींच्या इन्फ्रा आणि पॉवर स्टॉक्स पुन्हा चमकले, सलग दुसऱ्या दिवशी मोठी तेजी

अनिल अंबानींच्या इन्फ्रा आणि पॉवर स्टॉक्स पुन्हा चमकले, सलग दुसऱ्या दिवशी मोठी तेजी

Anil Ambani Stocks High: अनिल अंबानींच्या मालकीच्या दोन कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून या शेअरमध्ये घसरण सुरू होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 12:48 IST2025-11-27T12:48:27+5:302025-11-27T12:48:27+5:30

Anil Ambani Stocks High: अनिल अंबानींच्या मालकीच्या दोन कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून या शेअरमध्ये घसरण सुरू होती.

Anil Ambani s reliance infra and power stocks shine again big rise for second consecutive day | अनिल अंबानींच्या इन्फ्रा आणि पॉवर स्टॉक्स पुन्हा चमकले, सलग दुसऱ्या दिवशी मोठी तेजी

अनिल अंबानींच्या इन्फ्रा आणि पॉवर स्टॉक्स पुन्हा चमकले, सलग दुसऱ्या दिवशी मोठी तेजी

Anil Ambani Stocks High: अनिल अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी प्रचंड वाढ झाली आहे. गुरुवारी बीएसईवर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स ५% वाढून १६६.९५ रुपयांवर पोहोचले. बुधवारीही कंपनीचे शेअर्स ५% च्या अपर सर्किटसह १५९ रुपयांवर बंद झाले होते. याआधी, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स सलग ६ दिवस घसरले होते. मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी कंपनीचे शेअर्स १४९.८५ रुपयांच्या नवीन ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले होते. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ४२५ रुपये आहे.

सहा महिन्यांत ४५% पेक्षा अधिक घसरण

अनिल अंबानी यांच्या समूहाच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स गेल्या सहा महिन्यांत ४५% पेक्षा जास्त घसरले आहेत. २७ मे २०२५ रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स ₹३०६.८५ वर होते. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स ₹१६६.९५ वर आले. गेल्या महिन्यात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स २५% पेक्षा जास्त घसरले. या वर्षी आतापर्यंत अनिल अंबानींच्या मालकीच्या कंपनीचं ४७% पेक्षा जास्त नुकसान झालंय. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स त्यांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून ६०% पेक्षा जास्त घसरलेत.

आता कोणताही ग्रॅज्युएट बनू शकतो इनव्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायझर आणि रिसर्च अ‍ॅनालिस्ट, सेबीनं नियमांत केले बदल

रिलायन्स पॉवरमध्येही तेजी

अनिल अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्येही सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली. गुरुवारी रिलायन्स पॉवरचे शेअर्स ३% वाढून ४०.७९ रुपयांवर पोहोचले. बुधवारी बीएसईवर रिलायन्स पॉवरचे शेअर्स ५% पेक्षा जास्त वाढीसह ३९.४७ रुपयांवर बंद झाले. गेल्या सहा महिन्यांत अनिल अंबानींच्या पॉवर कंपनीचे शेअर्स २०% पेक्षा जास्त घसरले आहेत. गेल्या एका महिन्यात कंपनीचे शेअर्स सुमारे ९% घसरलेत. रिलायन्स पॉवरच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ७६.४९ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ३१.३० रुपये आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : अनिल अंबानी के इंफ्रा, पावर स्टॉक्स में जोरदार उछाल

Web Summary : रिलायंस इंफ्रा के शेयरों में लगातार दूसरे दिन उछाल, बीएसई पर 5% की वृद्धि। हालिया गिरावट के बावजूद, रिलायंस पावर में भी लाभ देखा गया। निवेशकों को निवेश से पहले विशेषज्ञों से सलाह लेनी चाहिए, क्योंकि ये स्टॉक अस्थिर हैं और इसमें जोखिम शामिल है।

Web Title : Anil Ambani's Infra, Power Stocks Rebound with Strong Gains

Web Summary : Reliance Infra shares surged for a second day, up 5% on BSE. Despite recent declines, Reliance Power also saw gains. Investors should consult experts before investing, as these stocks are volatile and involve risk.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.