Lokmat Money > बिझनेस न्यूज > अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार

अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार

Reliance Infrastructure Ltd: रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स येत्या काळात चर्चेत राहण्याची शक्यता आहे. कंपनी संरक्षण क्षेत्रात आपला पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 10:37 IST2025-06-09T10:34:35+5:302025-06-09T10:37:10+5:30

Reliance Infrastructure Ltd: रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स येत्या काळात चर्चेत राहण्याची शक्यता आहे. कंपनी संरक्षण क्षेत्रात आपला पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे.

anil ambani reliace infrastructure will invest rs 5000 crore ready to create history in the defense sector know details stocks in focus | अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार

अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार

Reliance Infrastructure Ltd: रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स येत्या काळात चर्चेत राहण्याची शक्यता आहे. कंपनी संरक्षण क्षेत्रात आपला पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. कंपनीनं आपल्या एअरक्राफ्ट डेव्हलपमेंट प्रोग्रामवर लक्ष केंद्रित करून गती देण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे पुढील ७-१० वर्षांत ५,००० कोटी रुपयांची संधी निर्माण होईल. शुक्रवारी कंपनीचा शेअर किरकोळ वाढीसह ३७१.५० रुपयांवर बंद झाला होता.

अधिक माहिती काय?

या धोरणात्मक निर्णयामुळे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही मूळ उत्पादक न बनता स्वतंत्रपणे मोठ्या प्रमाणात एअरक्राफ्ट अपग्रेड कार्यक्रम राबविणारी भारतातील खाजगी क्षेत्रातील पहिली कंपनी बनली आहे. हे असं क्षेत्र आहे ज्यावर पारंपारिकपणे सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स आणि ओईएम (ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स) यांचं वर्चस्व राहिलंय. 

Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि अमेरिकेतील एव्हिओनिक्स फर्म जेनेसिसच्या सहकार्याने ५५ डॉर्नियर-२२८ विमानांचे यशस्वी अपडेशन करून कंपनीनं यापूर्वीच महत्त्वपूर्ण टप्पा गाठलाय. सुरुवातीला ३७ विमानांचे कंत्राट देण्यात आलं होतं, तर रिलायन्सला आधीच्या कराराच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर अतिरिक्त १८ विमानांची पुन्हा ऑर्डर देण्यात आली. डॉर्नियर अपग्रेड कॉन्ट्रॅक्टची एकूण किंमत ३५० कोटी रुपये असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

कंपनीची योजना काय?

अपडेटेड डोर्नियर ताफा भारतीय हवाई दल, भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलासह कार्यरत आहे. लष्करी विमानं आणि हेलिकॉप्टर्सचा सेवा कालावधी ३०-४० वर्षांचा असतो, म्हणून नियमित अपडेट्स, विशेषत: एव्हिओनिक्स, मिशन सिस्टम आणि संरक्षण उपकरणं महत्वाची आहेत. उद्योग तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की अपग्रेड आणि देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (एमआरओ) मधील त्याची संपूर्ण गुंतवणूक प्लॅटफॉर्मच्या मूळ अधिग्रहण खर्चाच्या २००-३०० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. 

जागतिक स्तरावर लष्करी विमानं आणि हेलिकॉप्टर अपग्रेडची बाजारपेठ वार्षिक ५,००,००० कोटी रुपयांहून अधिक आहे आणि पुढील सात वर्षांत ती वाढून ७,००,००० कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. भारत देशांतर्गत भरपूर संधी उपलब्ध करून देत आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आता त्यांच्या विमान आणि हेलिकॉप्टर अपग्रेड क्षमता वाढवण्याचा विचार करत आहे, ज्यासाठी ते जागतिक दर्जाच्या उपाययोजनांसाठी जागतिक भागीदारांसोबत काम करत आहे. डॉर्नियर अपग्रेडच्या यशाव्यतिरिक्त, कंपनी फ्रान्सच्या थेल्ससोबत भागीदारीत भारतातील राफेल लढाऊ विमानांसाठी परफॉर्मन्स-बेस्ड लॉजिस्टिक्स (PBL) कार्यक्रमात देखील आघाडीवर आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: anil ambani reliace infrastructure will invest rs 5000 crore ready to create history in the defense sector know details stocks in focus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.