Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ; रिलायन्स पॉवरशी संबंधित ठिकाणांवर ED ची छापेमारी

अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ; रिलायन्स पॉवरशी संबंधित ठिकाणांवर ED ची छापेमारी

Anil Ambani ED Raid: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पहाटेपासून ईडीची कारवाई सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 11:59 IST2026-03-06T11:58:16+5:302026-03-06T11:59:48+5:30

Anil Ambani ED Raid: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पहाटेपासून ईडीची कारवाई सुरू आहे.

Anil Ambani ED Raid: ED raids places related to Reliance Power in Mumbai and Hyderabad | अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ; रिलायन्स पॉवरशी संबंधित ठिकाणांवर ED ची छापेमारी

अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ; रिलायन्स पॉवरशी संबंधित ठिकाणांवर ED ची छापेमारी

Anil Ambani ED Raid: अंमलबजावणा संचालनालयाने (ED) शुक्रवारी(दि.६) पहाटे उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स पॉवर लिमिटेडशी संबंधित काही व्यावसायिकांच्या ठिकाणांवर छापे टाकले. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीच्या सुमारे १५ विशेष पथकांनी ही कारवाई सुरू केली असून, मुंबईतील सुमारे १० ते १२ ठिकाणी तपास सुरू आहे. ही छापेमारी रिलायन्स पावरशी संबंधित व्यक्तींच्या निवासी आणि कार्यालयीन पत्त्यांवर करण्यात येत आहे. 

मुंबई आणि हैदराबादमध्ये तपास...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कारवाईचा मुख्य फोकस मुंबई आणि हैदराबाद येथील काही महत्त्वाच्या ठिकाणांवर आहे. तपासात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनी संबंधित पत्त्यांची माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच ED ने मुंबईतील पाली हिल परिसरातील अनिल अंबानी यांच्या आलिशान ‘अबोड’ या निवासस्थानाला तात्पुरते जप्त (प्रोव्हिजनल अटॅच) केले होते. या मालमत्तेची अंदाजे किंमत सुमारे ३,५०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

 मनी लॉन्ड्रिंग आणि संशयास्पद व्यवहारांची चौकशी

ही छापेमारी कथित आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या व्यापक तपासाचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रिलायन्स पॉवरशी संबंधित निधी हस्तांतरण आणि काही संशयास्पद आर्थिक व्यवहारांबाबत तपास सुरू आहे. मात्र या प्रकरणाबाबत ED अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. 

यस बँक कर्ज प्रकरणातही नाव

मीडिया रिपोर्टनुसार, डिसेंबर २०२५ मध्ये ईडीने यस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची चौकशी केली होती. हा तपास अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांना दिलेल्या कर्जाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी संबंधित होता. राणा कपूर यांना मार्च २०२१ मध्ये डीएचएफएलला दिलेल्या मोठ्या कर्जप्रकरणात अटक करण्यात आली होती.

‘क्विड-प्रो-क्वो’ कराराचा आरोप

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राणा कपूर आणि अनिल अंबानी यांच्यात ‘नुकसानाच्या बदल्यात फायदा’ (क्विड-प्रो-क्वो) असा कथित करार झाल्याचा आरोप आहे. त्यानुसार यस बँकेने रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली. ३१ मार्च २०१७ पर्यंत यस बँकेचे अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहावर सुमारे ६,००० कोटी रुपयांचे कर्ज होते, जे ३१ मार्च २०१८ पर्यंत वाढून सुमारे १३,००० कोटी रुपये झाला.

या काळात बँकेने रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेडमध्ये ५,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक केली होती. नंतर ही गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर अडकलेली (एनपीए) ठरली आणि बँकेला सुमारे ३,३०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले. तपास अधिकाऱ्यांच्या मते, हे व्यवहार सामान्य व्यावसायिक करार नसून, खासगी बैठकीत ठरवले गेले होते. या बैठकींमध्ये अनेकदा यस बँकेचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसत. 

Web Title : अनिल अंबानी की मुश्किलें बढ़ीं: ईडी ने रिलायंस पावर ठिकानों पर छापे मारे

Web Summary : ईडी ने मुंबई और हैदराबाद में अनिल अंबानी के रिलायंस पावर से जुड़े ठिकानों पर छापेमारी की, कथित मनी लॉन्ड्रिंग और संदिग्ध लेनदेन की जांच की। जांच रिलायंस पावर से जुड़े धन हस्तांतरण और सौदों पर केंद्रित है। यह अंबानी के मुंबई स्थित ₹3,500 करोड़ के आवास की कुर्की के बाद आया है।

Web Title : Anil Ambani's Troubles Deepen: ED Raids Reliance Power Locations

Web Summary : ED raided Anil Ambani's Reliance Power-related locations in Mumbai and Hyderabad, investigating alleged money laundering and suspicious transactions. The probe focuses on fund transfers and dealings linked to Reliance Power. This follows the provisional attachment of Ambani's Mumbai residence worth ₹3,500 crore and scrutiny of Yes Bank loan dealings.