Lokmat Money > बिझनेस न्यूज > आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 

आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 

Anant Ambani Wedding: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या कुटुंबामध्ये सध्या विवाह सोहळ्याची लगबग सुरू आहे. मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी यांचा विवाह सोहळा जुलै महिन्यात होणार आहे. अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्याची पत्रिका समोर आली असून, जुलै महिन्यामध्ये १२ ते १४ जुलैदरम्यान तीन दिवस हा विवाह सोहळा चालणार आहे. तसेच हा विवाह सोहळा मुंबईमध्ये संपन्न होणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 03:05 PM2024-05-30T15:05:49+5:302024-05-30T15:06:52+5:30

Anant Ambani Wedding: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या कुटुंबामध्ये सध्या विवाह सोहळ्याची लगबग सुरू आहे. मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी यांचा विवाह सोहळा जुलै महिन्यात होणार आहे. अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्याची पत्रिका समोर आली असून, जुलै महिन्यामध्ये १२ ते १४ जुलैदरम्यान तीन दिवस हा विवाह सोहळा चालणार आहे. तसेच हा विवाह सोहळा मुंबईमध्ये संपन्न होणार आहे. 

Anant Ambani Wedding Date: Ours is here by the grace of God... Anant Ambani's auspiciousness is in 'Aamchi Mumbai'; 'Asa' is a three-day ceremony  | आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 

आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या कुटुंबामध्ये सध्या विवाह सोहळ्याची लगबग सुरू आहे. मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी यांचा विवाह सोहळा जुलै महिन्यात होणार आहे. तत्पूर्वी अनंत अंबानी यांचा प्री वेडिंग सोहळा मार्च महिन्यात गुजरातमधील जामनगरमध्ये झाला होता. तर सध्या युरोपमध्ये दुसरा प्री वेंडिंग सोहळा सुरू आहे. यादरम्यान, अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्याची पत्रिका समोर आली असून, जुलै महिन्यामध्ये १२ ते १४ जुलैदरम्यान तीन दिवस हा विवाह सोहळा चालणार आहे. तसेच हा विवाह सोहळा मुंबईमध्ये संपन्न होणार आहे. 

जामनगर आणि युरोपमध्ये अनंत अंबानी आणि राधिका यांच्या प्री वेडिंगचा आलिशान सोहळा पार पडल्यानंतर या दोघांचा शुभ विवाहसुद्धा परदेशात होईल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र अनंत अंबानी यांची लग्नपत्रिका समोर आल्यानंतर या विवाह सोहळ्याचा संपूर्ण कार्यक्रम समोर आला आहे. या पत्रिकेमध्ये नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह १२ जुलै रोजी होईल. विवाहाचे सर्व कार्यक्रम मुंबईत होती. तसेच हा विवाह सोहळा जियो वर्ल्ड सेंटरमध्ये चालेल. १२ जुलै रोजी हा विवाह सोहळा हिंदू वैदिक पद्धतीने संपन्न होईल.  

असा असेल विवाह सोहळ्याचा कार्यक्रम
शुक्रवार १२ जुलै रोजी विवाह सोहळा आणि इतर धार्मिक विधी होतील. या सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांसाठी पारंपरिक भारतीय वस्रांचा ड्रेस कोड असेल. शनिवार १३ जुलै रोजी शुभआशीर्वाद सोहळा होईल. तर रविवार १४ जुलै रोजी रिसेप्शन सोहळा संपन्न होईल. मुंबईत होणाऱ्या या सोहळ्यामध्ये देश विदेशातील मान्यवरांसह, कलाकार, नेतेमंडळी आणि परदेशी पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.  

Web Title: Anant Ambani Wedding Date: Ours is here by the grace of God... Anant Ambani's auspiciousness is in 'Aamchi Mumbai'; 'Asa' is a three-day ceremony 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.