Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयपीओंच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकलं, वर्षभरात सर्वाधिक ३३७ आयपीओ भारतात; कोणत्या कंपन्या आघाडीवर?

आयपीओंच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकलं, वर्षभरात सर्वाधिक ३३७ आयपीओ भारतात; कोणत्या कंपन्या आघाडीवर?

युरोपच्या तुलनेत दुप्पट प्रमाण. अमेरिकेत वर्षभरात आलेल्या आयपीओंची संख्या १८३ इतकी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 09:28 IST2025-02-26T09:28:34+5:302025-02-26T09:28:34+5:30

युरोपच्या तुलनेत दुप्पट प्रमाण. अमेरिकेत वर्षभरात आलेल्या आयपीओंची संख्या १८३ इतकी आहे.

america gone behind india most of ipo s double than Europe 337 ipos in year india details | आयपीओंच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकलं, वर्षभरात सर्वाधिक ३३७ आयपीओ भारतात; कोणत्या कंपन्या आघाडीवर?

आयपीओंच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकलं, वर्षभरात सर्वाधिक ३३७ आयपीओ भारतात; कोणत्या कंपन्या आघाडीवर?

सध्या शेअर बाजारात अस्थिरतेचे ढग दिसत असताना एक दिलासादायक बाब समोर आली आहे. गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्याचा चांगला पर्याय देणाऱ्या आयपीओंच्या बाबतीत भारतानं अमेरिकेलाही मागे टाकल्याचे 'ईवाय ग्लोबल आयपीओ ट्रेंड्स २०२४' या अहवालातून हे समोर आले आहे. भारतात येणाऱ्या आयपीओंची संख्या जगात सर्वाधिक ३३७ इतकी आहे. युरोपच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. अमेरिकेत वर्षभरात आलेल्या आयपीओंची संख्या १८३ इतकी आहे.

आयपीओतून किती भांडवल उभारलं?

१९.९ अब्ज डॉलर्सचे भांडवल या अहवालानुसार भारतात २०२४ मध्ये आयपीओद्वारे उभारण्यात आले आहे. गेल्या दोन दशकांत भारतात आयपीओद्वारे जमा झालेली ही सर्वात मोठी रक्कम आहे, असंही हा अहवाल सांगतो. ३२.८ अब्ज मूल्याच्या दृष्टीनं अमेरिका पुन्हा जगात पहिल्या स्थानी आहे. भांडवल उभारण्याच्या बाबतीत २०२१ मध्येही अमेरिकेनं पहिलं स्थान गाठलं होतं.

'या' कंपन्या आघाडीवर?

आयपीओच्या विस्तारात प्रायव्हेट इक्विटी फर्म्स आणि व्हेंचर कॅपिटल फर्सनी मोठी भूमिका बजावली. जागतिक स्तरावर आयपीओद्वारे उभारलेल्या रकमेत या कंपन्यांचा वाटा ४६% इतका होता.

Web Title: america gone behind india most of ipo s double than Europe 337 ipos in year india details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.