Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या

अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण ५० टक्के शुल्क लादलंय. गेल्या महिन्यात त्यांनी २५ टक्के शुल्क आकारण्याची घोषणा केली तेव्हा भारताची अर्थव्यवस्थेला त्यांनी 'डेड इकॉनॉमी' म्हटलं होतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 14:02 IST2025-08-09T14:01:37+5:302025-08-09T14:02:49+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण ५० टक्के शुल्क लादलंय. गेल्या महिन्यात त्यांनी २५ टक्के शुल्क आकारण्याची घोषणा केली तेव्हा भारताची अर्थव्यवस्थेला त्यांनी 'डेड इकॉनॉमी' म्हटलं होतं.

America 1 Singapore 2 Norway 3 Donald Trump will be shocked to see this list which is the list share market economy | अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या

अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण ५० टक्के शुल्क लादलंय. गेल्या महिन्यात त्यांनी २५ टक्के शुल्क आकारण्याची घोषणा केली तेव्हा भारताची अर्थव्यवस्थेला त्यांनी 'डेड इकॉनॉमी' म्हटलं होतं. म्हणजेच ट्रम्प यांच्या नजरेत भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत आहे. पण जगात भारताची अर्थव्यवस्था अतिशय वेगानं वाढत आहे, हे कदाचित त्यांना माहित नसेल. ट्रम्प यांना भारताची अर्थव्यवस्था आवडत नसली तरी अमेरिकन लोकांना भारतीय अर्थव्यवस्थेचं वेड आहे.

याचं उदाहरण भारताच्या शेअर बाजारात पाहायला मिळते. भारतीय शेअर्समधील परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. भारताच्या परकीय पोर्टफोलिओ गुंतवणुकीत (एफपीआय) अमेरिकेनं ३० टक्क्यांहून अधिक गुंतवणूक केली आहे. या यादीत सिंगापूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजेच अमेरिकेपाठोपाठ सिंगापूरच्या जनतेचा भारतीय शेअर बाजारात सर्वाधिक पैसा गुंतलेला आहे.

आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

अमेरिकेचा वाटा किती?

भारतीय अर्थव्यवस्थेवरील अमेरिकन लोकांचा विश्वास वाढत आहे. यामुळेच ते भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. एप्रिल-जून २०२५ या तिमाहीत, भारतीय शेअरमध्ये एफपीआय गुंतवणुकीच्या बाबतीत अमेरिकेनं सिंगापूरला मागे टाकलंय.

देशाच्या एकूण एफपीआय होल्डिंगमध्ये अमेरिकन एफपीआयचा वाटा ३१.०४% होता, जो इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. या काळात, सिंगापूरचा वाटा २८.११% होता. गेल्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) सिंगापूर अमेरिकेपेक्षा थोडा पुढे होता. भारत-अमेरिका टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात अमेरिकन एफपीआयचा वाढता विश्वास भारतीय अर्थव्यवस्था मृत झालेली नाही हे दर्शवतो.

कोणत्या देशाचा किती वाटा?

भारतात एफपीआय होल्डिंगच्या बाबतीत टॉप १० देशांमध्ये अमेरिका, सिंगापूर, नॉर्वे, मॉरिशस, केमन आयलंड, लक्झेंबर्ग, यूएई, कतार, ब्रिटन आणि जपान यांचा समावेश आहे. टॉप ५ देशांचा एफपीआयमध्ये ९० टक्के वाटा आहे. हा वाटा खालीलप्रमाणे आहे:

  • अमेरिका: ३१.०४%
  • सिंगापूर: २८.११%
  • नॉर्वे: १५.४०%
  • मॉरिशस: ११.२५%
  • केमन आयलंड: ४.०८%

Web Title: America 1 Singapore 2 Norway 3 Donald Trump will be shocked to see this list which is the list share market economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.