... तर पर्सनल लोन घेतल्यास होईल मोठे आर्थिक नुकसान, व्याजदर पाहून कर्ज घेऊ नका

अनेकदा स्वस्त वाटणारं कर्ज छुप्या खर्चामुळे खूप महागात पडू शकते. 

पर्सनल लोन घेताना केवळ कमी व्याजदर पाहून लगेच निर्णय घेऊ नका. कारण अनेकदा स्वस्त वाटणारे कर्ज काही छुप्या खर्चामुळे खूप महागात पडू शकते. 

तुम्ही ईएमआय वेळेवर भरला नाही, तर बँक मोठा दंड आकारते. यामुळे क्रेडिट स्कोअरवरही नकारात्मक परिणाम होतो.काही बँका इन्श्युरन्ससाठीही पैसे घेतात. 

याशिवाय, कर्ज लवकर मंजूर करून घेण्यासाठी वेगळं शुल्क आकारलं जाऊ शकतं. कोणतंही कर्ज घेण्यापूर्वी सर्व छुपे खर्च आणि नियम-अटी यांची माहिती घ्या..

प्रोसेसिंग फी: कर्ज मंजूर करण्यापूर्वी बँक किंवा वित्तीय संस्था फी घेतात. ही फी कर्जाच्या १ ते ३ टक्के असू शकते. यामुळे एकूण कर्जाचा खर्च वाढतो.

फोरक्लोजर आणि प्री-पेमेंट चार्ज : कर्जाची मुदत संपण्याआधीच त्याची परतफेड केल्यास बँक फोरक्लोजर चार्ज आकारते. तसंच, काही भाग आधीच भरल्यास प्री-पेमेंट पेनल्टी लागू शकते.

जीएसटी: प्रोसेसिंग फी, फोरक्लोजर चार्जवर १८ टक्के जीएसटी लागतो. यामुळे तुमचा खर्च आणखी वाढतो.

स्टँडिंग इन्स्ट्रक्शन बाऊन्स चार्जेस : ईएमआय भरण्यासाठी स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिली असेल व खात्यात पैसे नसतील, तर हा व्यवहार बाऊन्स होतो आणि बँक त्यासाठी शुल्क आकारते.

पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील १,११,०००

Click Here