Pushpa 2 Coupon Code : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन स्टारर चित्रपट पुष्पा २ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ५ डिसेंबरला रिलीज झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १७५ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्याचवेळी, पहिल्या दिवशी त्याची जागतिक कमाई २९४ कोटी रुपये होती. विश्लेषकांच्या मते, चित्रपटाने २ दिवसांत जगभरात ४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. अशा प्रकारे पुष्पा २ हा दोन दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. पुष्पा-२ चे तिकीटही थिएटरमध्ये खूप महाग होत आहे. अनेक ठिकाणी १८०० रुपयांपर्यंत तिकीटाची किंमत गेली आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला स्वस्तात तिकिट खरेदी करण्याची संधी निर्माण झाली आहे.
ब्लिंकिट देतोय डिस्काउंट व्हाउचर
झोमॅटोची लोकप्रिय किराणा डिलिव्हरी सेवा ब्लिंकिटने ग्राहकांना पुष्पा २ तिकिटांवर वन टाइम डिस्काउंट कूपन देण्याची घोषणा केली आहे. ब्लिंकिट आपल्या ग्राहकांना ९९९ रुपयांच्या खरेदीवर २०० रुपयांचे डिस्काउंट व्हाउचर देत आहे. ही ऑफर ब्लिंकिट अॅपवर उपलब्ध आहे. प्रत्येक ग्राहकाला ही ऑफर एकदाच मिळणार आहे. हे व्हाउचर भारतातील सर्व चित्रपटगृहांमधील कोणत्याही सीटसाठी रिडीम केले जाऊ शकते. या व्हाउचरसह तुमच्या तिकिटाची किंमत २०० रुपयांनी कमी होईल.
ऑफर 15 डिसेंबरपर्यंत
ब्लिंकिटवरून १५ डिसेंबरपर्यंत तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. ही सवलत फक्त तिकिटाच्या किमतीवरच मिळणार आहे. ही ऑफर बुकिंग ऑर्डरमध्ये जोडलेल्या इतर वस्तू आणि सुविधा शुल्कांवर लागू होणार नाही. बिलकिंटकडून डिलिव्हरी केल्यानंतर, तुम्हाला ऑर्डर समरी पेजवर या व्हाउचरचे तपशील मिळतील. ब्लिंकिट तुम्हाला हे तपशील WhatsApp वर देखील पाठवेल. पुष्पा २ तिकिटांवर २०० रुपयांची सूट मिळवण्यासाठी तुम्ही District App वर हा व्हाउचर कोड टाकू शकता.