lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > १ एप्रिलपासून विमान प्रवास महागणार; 'हे' आहे कारण

१ एप्रिलपासून विमान प्रवास महागणार; 'हे' आहे कारण

१ एप्रिल पासून विमान प्रवास महागणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 12:19 PM2021-03-30T12:19:44+5:302021-03-30T12:21:54+5:30

१ एप्रिल पासून विमान प्रवास महागणार आहे

airfare will increase from 1st april dgca will increase airport security fees | १ एप्रिलपासून विमान प्रवास महागणार; 'हे' आहे कारण

१ एप्रिलपासून विमान प्रवास महागणार; 'हे' आहे कारण

Highlights१ एप्रिल पासून विमान प्रवास महागणार आहेयापूर्वी सप्टेंबर महिन्यात वाढवण्यात आलं होतं शुल्क

जर तुम्ही विमान प्रवास करत असाल तर १ एप्रिलपासून तुमच्या खिशावर अधिक ताण पडणार आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) देशांतर्गत प्रवासासाठी ४० रूपयांची वाढ केली आहे. प्रवाशांच्या तिकिटाच्या दरात असलेल्या एअरपोर्ट सिक्युरिटी फी (ASF) वाढ करण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) घेतला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या नागरीकांसाठी ११४.३८ रूपयांचं अधिक शुल्क वसूल केलं जाणार आहे. 

एअरपोर्ट सिक्युरिटी फीचा वापर एअरपोर्टच्या सुरक्षेसाठी केला जातो. शुल्क वाढीनंतर आता देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एकूण २०० रूपयांचं शुल्क आकारलं जाणार आहे. तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांना १२ डॉलर्स इतकं शुल्क द्यावं लागणार आहे. हे नवे दर आता १ एप्रिलपासून लागू होणार आहे. एअरपोर्ट सिक्युरिटी फी प्रत्येक प्रवाशाकडून आकारले जातात. परंतु काही प्रवाशांना यात सूटही दिली जाते. यामध्ये २ वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं, डिप्लोमॅटिक पासपोर्ट ठेवणारे अधिकारी आणि ऑनड्युटी एअरलाईन क्रू आणि एकाच तिकिटावर पहिल्या विमानाच्या चोवीस तासांच्या आत कनेक्टिंग विमान असलेल्या ट्रान्झिट प्रवाशांना यातून सूट देण्यात येते.

एअरपोर्ट सिक्युरिटी फीचा दर सहा महिन्यांनी आढावा घेतला जातो. सप्टेंबर २०२० मध्ये एअरपोर्ट सिक्युरिटी शुल्कात १५० रूपयांवरून १६० रुपये म्हणजेच १० रूपयांची वाढ करण्यात आली होती. तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ते शुल्क ४.९५ डॉलर्सवरून ५.२० डॉलर्स इतकं करण्यात आलं होतं.

Web Title: airfare will increase from 1st april dgca will increase airport security fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.